कृष्ण मुकुंद उजळंबकर
कृष्ण मुकुंद उजळंबकर हे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक होते. गाव तेथे ग्रंथालय ही त्यांची कल्पना, त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने राबवली. त्यांनी ग्रंथालयांतील पुस्तकांचे वर्गीकरण आणि अन्य विषयांवर बरीच पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक कादंबऱ्याही लिहिल्या आहेत.
पुस्तके
- अभय
- अशी रंगली प्रीत
- आम्ही असे लढलो
- आम्ही लढाई जिंकलो
- गाव तेथे ग्रंथालय
- ग्रंथालय संघटन
- ग्रंथालय वर्गीकरण तात्त्विक
- ग्रंथालय वर्गीकरण प्रात्यक्षिक
- ग्रंथालय विधान
- ग्रंथालय शास्त्राची पाच सूत्रे. भाग १, २
- ग्रंथालय संघटन भाग १, २
- ग्रंथालय सूचीकरण तात्त्विक
- छळ
- त्रिवेणी
- धूर
- धोंडी
- दशांश वर्गीकरण
- द्विबिंदु वर्गीकरण
- धर्मचक्र
- नवोन्मेष
- पराग (कादंबरी)
- पराजित (कादंबरी)
- पाचामुखी परमेश्वर (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)
- प्रतिष्ठा
- प्रश्र्नोतर ग्रंथालयशास्त्र माला
- प्रारब्ध
- भारतीय ग्रंथालय चळवळ
- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय मार्गदर्शिका भाग १ ते ३
- महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम : एक अभ्यास
- महाविद्यालयीन ग्रंथालय भाग १ ते ३
- मायेचे कढ (कादंबरी)
- राजा कुबेर
- शालेय ग्रंथालय -ग्रंथालय कारभार; मंत्र आणि तंत्र; भाग १ ते ३
- पद्मश्री शि.रा. रंगनाथन् व्यक्ति व कार्य
- संघर्ष ( हुंडाबळीवरील कादंबरी)
- संदर्भ सेवा
- सिंधु
- सूचीकरण प्रायोगिक
पुरस्कार
कै. कृष्ण मुकुंद उजळंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एका लेखकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून 'कृष्ण मुकुंद' पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्ती (कंसात वर्ष) :
- डाॅ. नरेश नाईक (विरार) यांच्या 'सामवेदी बोली' या ग्रंथास (२०१८)
- श्री. शिवाजीराव एक्के (पुणे) यांच्या 'पुरंदरचे धुरंधर' या ग्रंथास (२०१७)
- प्रभा गणोरकर यांना त्यांच्या ‘स्त्रियांची कविता’ या ग्रंथासाठी (२०१६)
- मकरंद साठे यांना त्यांच्या 'मराठी नाटकाचा इतिहास (तीस रात्री)' या ग्रंथास (२०१५)
- शेषराव मोरे यांना 'काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?' या पुस्तकाला (२०१४)
- डॉ. मधुकर ढवळीकर यांना त्यांच्या ‘महाराष्ट्राची कुळकथा’ या संशोधनपर ग्रंथाला (२०१३)