Jump to content

कृष्ण गंगाधर दीक्षित

कृष्ण गंगाधर दीक्षित
जन्म नाव कृष्ण गंगाधर दीक्षित
टोपणनाव कवी संजीव
जन्मएप्रिल १४, १९१४
वांगी, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यूफेब्रुवारी २८, १९९५
सोलापूर
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता
वडील गंगाधर गोविंद दीक्षित

कृष्ण गंगाधर दीक्षित ऊर्फ कवी संजीव (एप्रिल १४, १९१४ - फेब्रुवारी २८, १९९५) हे मराठी कवी व गीतकार होते.

जीवन

कवी संजीवांचा जन्म एप्रिल १४, १९१४ रोजी महाराष्ट्रात सोलापुराजवळील 'वांगी' या गावी झाला. लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बॉंबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले.
संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे संजीवांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली.

कारकीर्द

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अत्तराचा फायाकवितासंग्रह१९७९
आघातकवितासंग्रह१९८६
गझलगुलाबकवितासंग्रह१९८०
देवाचिये द्वारीकवितासंग्रह१९८६
दिलरुबाकवितासंग्रह१९३५
प्रियंवदाकवितासंग्रह१९६२
माणूसकवितासंग्रह१९७५
रंगबहारकवितासंग्रह१९८३

चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
१९५७चाळ माझ्या पायातमराठीगीतरचना
१९६७पाटलाची सूनमराठीगीतरचना
१९५७भाऊबीजमराठीगीतरचना
१९५६सासर माहेरमराठीगीतरचना

कृ.गं. दीक्षित यांनी लिहिलेली व गाजलेली गीते

  • अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
  • असा कसा खट्याळ तुझा (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
  • आवाज मुरलीचा आला (भावगीत; गायिका - माणिक वर्मा; संगीत दिग्दर्शक - डी.यू. कुलकर्णी)
  • कधी शिवराय यायचे (चित्रपट - थोरातांची कमळा; गायिका - उषा मंगेशकर; संगीत दिग्दर्शक - दत्ता डावजेकर)
  • खुलविते मेंदी माझा रंग (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; राग - भैरवी)
  • चाळ माझ्या पायात (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
  • झुळझुळे नदी ही बाई (चित्रपट - थोरातांची कमळा; गायिका - उषा मंगेशकर, मीना खडीकर; संगीत दिग्दर्शक - दत्ता डावजेकर)
  • तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।। (कविता)
  • पडला पदर खांदा तुझा (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते; लावणी)
  • वेड्या बहिणीची रे वेडी (चित्रपट - भाऊबीज; गायिका - आशा भोसले; संगीत दिग्दर्शक - वसंतकुमार मोहिते)

बाह्य दुवे