Jump to content

कृषी पराशर

कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून ते ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.वेळ अमावास्या

कृषि-पराशर या ग्रंथाचा लेखक पराशर  कोण असावा याविषयीही मतभिन्नता आहे,तथापि वैदिक काळातील सूक्तद्रष्टा पराशर हा या ग्रंथाचा कर्ता नाही असेही अभ्यासक मानतात.

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

सदर ग्रंथात सामान्यत: पावसाचे, वादळवार-याचे अंदाज, पशुधनाचे व्यवस्थापन,बीजाची निवड व जोपासना,जलाचे व्यवस्थापन, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे. मानवी जीवनात दैनंदिन व्यवहारातही परमेश्वराचे आशीर्वाद घेऊनच एखाद्या कार्याचा आरंभ करण्याची परंपरा आहे. सदर ग्रंथातही शेतीविषयक कामांची सुरुवात करताना पूजनाचे काही विधी सांगितले आहेत. तसेच मानवी समूह हा उत्सवप्रिय असतो. समूहाने एकत्रितपणे साजरे करण्याचे शेतीसंदर्भातील काही उत्सवही या ग्रंथात सांगितले आहेत.

संदर्भ आणि नोंदी

डॉ. वर्णेकर श्रीधर भास्कर, १९८८,संस्कृत  वाङ्ग्मय कोश (द्वितीय खंड), प्रकाशक- भारतीय भाषा परिषद , कलकत्ता . पृ.८०)