Jump to content

कृत्रिम भाषा

कृत्रिम भाषा किंवा नियोजित भाषा ही एक अशी भाषा असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते. ह्यास मानवनिर्मित भाषा असेही म्हणले जाते. कृत्रिम भाषा निर्माण करण्यासाठी अनेक हेतू असू शकतात, उदा. सुलभ व सोपा संवाद, काल्पनिक जगनिर्मिती, प्रयोग इत्यादी.

जुलै २०११ मधील एका पाहणीनुसार एस्पेरांतो, इंटरलिंग्वाक्लिंगॉन ह्या जगातील तीन सर्वाधिक वापरात असलेल्या कृत्रिम भाषा होत्या.

यादी

खालील यादीमध्ये आय.एस.ओ. ६३९ ह्या प्रमाणाने मान्यता दिलेल्या कृत्रिम भाषा दिल्या आहेत.

भाषेचे नावISOप्रथम वापरनिर्मिता
व्होलाप्युकvo, vol1879–1880योहान मार्टिन श्लेयर
एस्पेरांतोeo, epo1887एल.एल. झामेनहॉफ
इदोio, ido1907एस्पेरांतो भाषिकांचा एक समूह
ऑक्सिडेंटलie, ile1922एड्गर दे वाह्ल
नोव्हियलnov1928ओट्टो जेस्परसन
इंटरलिंग्वाia, ina1951इंटरनॅशनल ऑक्झिलियरी लॅंग्वेज असोसिएशन
लिंग्वा फ्रांका नोव्हाlfn1998सी. जॉर्ज बोएरी

बाह्य दुवे