Jump to content

कूप नलिका

कूप नलिका म्हणजे कमी व्यासाची (१ फुटा पेक्षा कमी) खोल विहीर होय. यासाठी ड्रिलच्या सहाय्याने जमिनीला खूप खोल, सरळ भोक पाडले जाते. यातून जमिनीतील जिवंत झऱ्याचे पाणी वापरण्यास उपलब्ध होते. या विहिरीतून रहाट लावून पाणी काढता येत नाही. कूप नलिका या प्रकारच्या विहिरीतून मोटार लावून किंवा हातपंप लावून पाणी वर काढले जाते. कूप नलिका मोठ्या विहीरीपेक्षा खूपच कमी खर्चात, कमी वेळात खणली जाते. कूप नलिका बहुतेकदा एका दिवसात खणली जाते.