कुसुंब
कुसुंब हा वृक्ष शहरात कमी प्रमाणात आढळतो. कुसुंब हा मुळातच भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. तो हिमालयाच्या पायथ्यापासून दक्षिणेकडे संपूर्ण भारतभर आढळतो. हा उष्णकटीबंधातील वृक्ष असल्याने कोरड्या हवेत असला तरी त्याला दमट हवामान जास्त मानवते. भारताशिवाय श्रीलंका, मलेशिया, जावा इ. ठिकाणी देखील यांचे वास्तव्य आढळते. कुसुंब हा ५०-६० फुट उंची पर्यत सहज वाढतो. हा दाट सावली देणारा वृक्ष आहे. याच्या दाट पानाच्या रचनेमुळे झाडाखाली दाट गारवा असतो. याच्या फांद्या झाड करड्या रंगाच्या असून याचे खोड मध्यम उंचीचे असते. अगदी ८-१० फुटापासून फांद्यांचा पसारा सुरू होतो. कुसुंबाची पाने ही संयुक्त पर्णदले असून पाने एकाच बिंदू वरून समोरासमोर येतात. त्यामुळे दोनी बाजूकडील पानाची संख्या समप्रमाणात असते. एका पर्णदलात साधारणपणे ३- जोड्या असतात. पाने गर्द लाल रंगाची असून हा रंग बरेच दिवस टिकून राहतो. हळूहळू पावसाला सुरुवात होते आणि पावसाच्या पाण्यात सचैल स्नान करून झाड आपले रूप हळूहळू बदलू लागते आणि कुसुंब४ जंगलाच्या हिरव्या रंगात हरून जाते. पावसाळ्यात पिवळ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचे तुरे झाडावर बहरू लागतात. फुलांचा आकार कपासारखा असून, बाह्य भाग चार ते सहा भागात विभागाला असल्याने पाकळ्या सारखा दिसतो लांबकोळया फळांच्या टोकावर चार पाच काटे दिसू लागतात. ही फळे पावसाळ्यात परिपक्व होतात. या फळांमध्ये आंबट-गोड असा गर असतो. या फळांमध्ये चपट्या, गोलाकार, अर्ध्या ते एक ग्रॅम वजनाच्या एक ते दोन बिया असतात. या बियांच्या गरामध्ये आठ ते बहात्तर टक्के एवढा तेलाचा अंश असतो. लॅटीन भाषेत याचा अर्थ तेलयुक्त किवा तेलाने समृद्ध असा आहे. भारतामध्ये याला याच नावाने ओळखले जाते. संस्कृत मध्ये याला मुकुलक, रक्ताम्र तसेच लाक्षावृक्ष असे म्हणतात. कुसुंब हा औषधोपयोगी वृक्ष असून, सालीचा तसेच तेलाचा औषधामध्ये वापर होतो. या तेलाचा वापर साबण तसेच केशकाल तेल तयार करण्यासाठी होतो. हे तेल निर्यात करणारा भारत हा प्रमुख देश आहे. या तेलाचे भारतातील वार्षिक उत्पादन ४ ते ५ हजार टन असून, हे तेल आयात करणारा जर्मनी हा प्रमुख देश आहे. या झाडांची लागवड बियांपासून तसेच मुळापासून जे अंकुर फुटतात त्यापासून करता येते. या झाडांची लागवड वनखात्याकडून जंगलाच्या परिसरात होते.
संदर्भ
मुंबईची वृक्षराजी प्रकाशक =मुग्धा कर्णिक