कुशीनगर एक्सप्रेस
११०१५/११०१६ कुशीनगर एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूरच्या गोरखपूर रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी ही गाडी मुंबई व गोरखपूर दरम्यानचे १,६७९ किमी अंतर ३२ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते.
कुशीनगर ह्या गोरखपूरजवळील प्रसिद्ध बौद्ध पर्यटनस्थळावरून ह्या गाडीचे नाव पडले आहे. गोरखपूर व मुंबईदरम्यान रोज धावणाऱ्या तीन प्रवासी गाड्यांपैकी ही एक आहे (इतर: काशी एक्सप्रेस, गोरखपूर − लोकमान्य टिळक टर्मिनस जलद एक्सप्रेस).
प्रमुख थांबे
- लोकमान्य टिळक टर्मिनस
- ठाणे रेल्वे स्थानक
- कल्याण रेल्वे स्थानक
- इगतपुरी रेल्वे स्थानक
- नाशिक रोड रेल्वे स्थानक
- मनमाड रेल्वे स्थानक
- जळगाव रेल्वे स्थानक
- भुसावळ रेल्वे स्थानक
- खंडवा रेल्वे स्थानक
- इटारसी रेल्वे स्थानक
- भोपाळ रेल्वे स्थानक
- झाशी रेल्वे स्थानक
- कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक
- लखनौ चारबाग रेल्वे स्थानक
- गोरखपूर रेल्वे स्थानक