Jump to content

कुशावर्त

कुशावर्त हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेले एक प्रमुख तीर्थ आहे. गोदावरी नदी आपल्या उगमस्थानापासून भूगर्भमार्गाने कुशावर्त कुंडात प्रकट होते असे मानलेले आहे. गौतम ॠषीने कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी याठिकाणी अडवून ठेवले म्हणून याला कुशावर्त असे नाव पडले. हे कुंड चारही बाजूंनी बांधलेले आहे.

या तीर्थाच्या जवळच गंगामंदिर, इंद्रेश्वर, गायत्री, बल्लाळेश्वर इत्यादी देवळे आहेत.