कुवेत टाॅवर्स
कुवैत शहरातील तीन पातळ टॉवर्सचा समूह | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | इमारत कॉम्प्लेक्स, architectural landmark | ||
---|---|---|---|
वापरलेली सामग्री |
| ||
स्थान | कुवेत सिटी, कुवेत | ||
वास्तुविशारद |
| ||
वारसा अभिधान |
| ||
उंची |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
कुवेत टाॅवर्स हा कुवेत शहरातील तीन सडपातळ टॉवर्सचा समूह आहे. हा इराणच्या आखातात प्रमोटोरीवर उभा आहे. हे टाॅवर्स बांधताना टाॅवर्सच्या इतर पाच गटांपेक्षा वेगळी शैली वापरण्यात आली. कुवेत टाॅवर्सचे उद्घाटन १९७९ सालच्या मार्चमध्ये झाले आणि कुवेत टाॅवर्सना आधुनिक कुवेतचे चिन्हांकित प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. [१] [२]
बांधकाम
कुवेत टाॅवर्सचा मुख्य टॉवर १८७ मीटर (६१४ फूट) उंच आहे, टाॅवर्सच्या वरच्या भागात एक कॅफे, एक लाऊंज आणि ९० लोकांना सामावून घेण्याच्या क्षमतेचा हॉल असणारे एक रेस्टॉरंट आहे व खालील भागात ४५०० क्यूबिक मीटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.
टाॅवर्सचा वरील गोलार्ध समुद्रसपाटीपासून १२३ मीटर (४०४ फूट) उंचीवर असून हा गोलार्ध स्वतःभोवती फिरतो व ३० मिनिटांत एक फेरी पूृ्र्ण करतो. याच भागात कॅफे आहे. दुसरा टॉवर १४७ मीटर म्हणजेच ४८२ फूट उंचीचा असून तो पाणी पुरवठा करणारा टाॅवर म्हणून काम करतो. तिसरा टॉवर, उर्वरित दोन टाॅवर्सना आधार देण्याचे काम करतो. इतर दोन टाॅवर्सप्रमाणे या टाॅवरमध्ये पाणी, घरगुती उपकरणे साठवली जात नाहीत. कुवेत टाॅवर्सचे पाण्याचे टाॅवर एकूण ९००० क्यूबिक मीटर (२४ लाख अमेरिकन गॅलन म्हणजेच २० लाख आयपी गॅलन) पाणी साठवण्याची क्षमता ठेवतात.
कुवेत टाॅवर्स मध्ये तीन टाॅवर्स असले तरीदेखील त्याचा उल्लेख एकत्रितरित्या कुवेत टाॅवर्स असाच केला जातो. स्वीडिश अभियांत्रिकी कंपनी व्हीबीबीने (१९९७ मध्ये जिचे नाव बदलून स्वेको झाले) चालविलेल्या जल वितरण प्रकल्पाचा भाग म्हणून कुवेत टाॅवर्सचे डिझाईन डॅनिश आर्किटेक्ट मालेने बोरर्न यांनी केले होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य आर्किटेक्ट सुने लिंडस्ट्रॉम यांनी त्याच्या विशिष्ट "मशरूम" वॉटर टॉवर्सचे पाच गट तयार केले होते परंतु कुवेतचे अमीर शेख जाबर अल अहमद यांना सहाव्या गटासाठी अधिक आकर्षक डिझाईन हवे होते. दहा वेगवेगळ्या डिझाईन्समधून, अमीर यांना तीन डिझाइईन्स सादर करण्यात आली, त्यातून एक डिझाईन निवडले गेले आणि शेवटी व्हीबीबीने या तीन कुवेत टाॅवर्सचे बांधकाम केले. १९७१ ते १९७६ या कालावधीत इमारत बांधण्यात आली आणि १ मार्च १९७९ रोजी मुख्य टाॅवर खुला करण्यात आला.
ओळख
१९८० मध्ये कुवैत टावर्ससह, कुवैत वॉटर टावर्स सिस्टम आर्किटेक्चरसाठी आगा खान अवॉर्डचे प्रथम विजेता झाले. हे पाकिस्तान येईल लाहोरच्या शालिमार गार्डन मध्ये आजोजित करण्यात आले होते.[३]
गॅलरी
- चित्र:Kuwait Towers.jpg
- चित्र:Kuwaittowers.jpg
- चित्र:Kuwaittower1.jpg
- चित्र:Kuwaittower.jpg
- चित्र:Kuwait - Kuwait Towers.jpg
संदर्भ
- ^ Centre, UNESCO World Heritage. "Abraj Al-Kuwait - UNESCO World Heritage Centre". whc.unesco.org (इंग्रजी भाषेत). 2018-11-24 रोजी पाहिले.
- ^ "Kuwait Towers to open March 8 - Kuwait Times". Kuwait Times (इंग्रजी भाषेत). 2016-02-22. 2018-11-24 रोजी पाहिले.
- ^ "1980 Cycle | Aga Khan Development Network". www.akdn.org. ६ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.