Jump to content

कुलाबकर आंग्रे सरखेल (पुस्तक)

कुलाबकर आंग्रे सरखेल
आंग्रे घराण्याचा इतिहास
लेखकदा.गो. ढबू
भाषामराठी
देशभारत भारत
साहित्य प्रकारऐतिहासिक
प्रकाशन संस्थालेखक
प्रथमावृत्ती१९३९
विषयआंग्रे घराण्याचा इतिहास
माध्यममराठी
पृष्ठसंख्या४८०

कुलाबकर आंग्रे सरखेल हे दा.गो. ढबू लिखित मराठी भाषेतील आंग्रे घराण्याचा इतिहास सांगणारे पुस्तक आहे.

ग्रंथ ओळख

दामोदर गोपाळ ढबू (भट) ह्यांनी ह्या ग्रंथाचे लेखन केले आहे. १७व्या - १८व्या शतकात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील मराठ्यांच्या आरमाचे प्रमुख असलेल्या आंग्रे घराण्याचा इतिहासाचे लेखन ह्या ग्रंथातून केले गेले आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा कान्होजी आंग्रे ह्यांचा आरमाराचे प्रमुख म्हणून उदय झाला तेव्हा पासून १९३९ पर्यंतचा आंग्रे घयाण्याचा इतिहास ह्या ग्रंथात आहे. ह्या ग्रंथात ग्रंथाविषयी गो.स. सरदेसाईन.चिं. केळकर ह्यांचे अभिप्राय छापले गेले आहे. ग्रंथाच्या शेवटी आंग्रे इतिहासाची १४० पानांची शकावली जोडली आहे. ह्या शकावलीचे लेखन शं.ना. जोशी ह्यांनी केले आहे.

पुनर्मुद्रण

१९३९ साली प्रकाशित झालेल्या ह्या दुर्मिळ पुस्तकांचे श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन ह्या संस्थेने पुनर्मुद्रण केले आहे. ह्या पुनर्मुद्रण आवृत्तीचे प्रकाशन दि. ०७ मार्च २०२१ रोजी आंग्रे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ह्यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे झाले. ह्या पुनर्मुद्रीत आवृत्तीचे संपादन दिपक पटेकर , संतोष जाधव, अंकुर काळे ह्यांनी केले आहे.[]

ह्या पुनर्मुद्रीत आवृत्तीत नाम व स्थलसूची तसेच काही छायाचित्रे अशी नव्याने भर टाकण्यात आली आहे.

संदर्भ

  1. ^ "'आंग्रे घराण्याचा इतिहास' पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन".