Jump to content

कुलदीप पवार

कुलदीप पवार
जन्मकुलदीप पवार
२४ डिसेंबर, इ.स. १९४९
कोल्हापूर
मृत्यू २४ मार्च, २०१४ (वय ६४)
मुंबई, महाराष्ट्र
इतर नावे केपी, डॅड्डी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके)
भाषामराठी
प्रमुख नाटके इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला
प्रमुख चित्रपट अरे संसार संसार, गुपचूप, वजीर, जावयाची जात
प्रमुख टीव्ही कार्यक्रम परमवीर
पत्नी नीलिमा

कुलदीप पवार (२४ डिसेंबर, इ.स. १९४९ - २४ मार्च, इ.स. २०१४; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते होते. अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिन कामाचा नवरा, गुपचूप, वजीर, जावयाची जात या चित्रपटांमधील, तसेच इथे ओशाळला मृत्यू, निष्कलंक, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला या नाटकांमधील यांच्या भूमिका विशेष गाजल्या. परमवीर या दूरदर्शनावरील मालिकेमुळे यांना भरपूर लोकप्रियता लाभली.

कारकीर्द

कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील बाळ पवार हे मराठी चित्रपटांत छोट्या छोट्या भूमिका करावयाचे. ते पाहून कुलदीप पवार यांच्यामध्ये लहानपणापासून अभिनयाची आवड निर्माण झाली होती.कुलदीप वसंत पवार यांचा जन्म १० जून १९४९ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील वसंतराव पवार मोटारसायकलीच्या एजन्सीचे काम करत आणि त्यांच्या आई शांतादेवी यांनी गुजराती शाळा चालवली होती. त्यांचे वडील व्हायोलिन आणि माऊथ ऑर्गन वाजवत तर त्यांच्या आई उत्तम नकला करत. कुलदीप पवार यांचे शिक्षण ' सेट झेविअर्स ' स्कुलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.  शालेय वयातच त्यांनी सुलोचनबाईच्या हस्ते  बक्षिसेही मिळवली. ' ज्यांना काही करता येत नाही तेच सिनेमात जातात ' अशी त्या काळात समजूत होती, लोकांची धारणा होती. त्याचकाळात कुलदीप पवार यांनी या क्षेत्रात यायचे ठरवले . त्यांच्या वडिलांकडून त्यांना विरोधही झाला कारण त्यांचे म्हणणे होते आजोबांची ' जयश्री ' , ' प्रताप ' आणि ' वसंतबहार ' ही  सांगली-कोल्हापूरची थिएटर्स सांभाळ , असे त्यांचा वडिलांचे म्हणणे होते. एकीकडे अभिनयाचा ओढा आणि दुसरीकडे घरी होणारा विरोध यामध्ये ते पुरते सापडले होते आणि त्याच वेळी वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून पळून कऱ्हाडला आले आणि ' हिंदुस्थान गियर्स ' कंपनीमध्ये कामाला लागले. लेथवर काम केल्यावर खाली पडणारा कचरा उचलण्याचे काम त्यांना देण्यात आले आणि पगार होता फक्त ९० रुपये. संध्याकाळी काम संपल्यावर ते कामगारांची  नाटके बघत आणि याच काळात कृष्णा पाटील यांचे कुलदीप पवार यांच्याकडे लक्ष गेले आणि ' एक माती अनेक नाती ' या चित्रपटाबद्दल त्यांना विचारण्यात आले. तो त्यांचा पहिलाच चित्रपट होता. परंतु तो चित्रपट फारसा चालला नाही.  आपल्याला अभिनयात अजून सुधारणा करायला हवी हे त्यांना कळून चुकले म्हणूंन ते पुण्यास आले. त्यांना मार्गदर्शन करणारी या क्षेत्रातील अनेक माणसे भेटली  परंतु काम काही मिळाले नाही म्हणून ते मुंबईला आले . त्याचा उपयोग करण्यासाठी ते कोल्हापूर सोडून मुंबईस गेले. मुंबईत दाखल झाल्यावर त्यांची प्रभाकर पणशीकरांशी ओळख झाली. त्या सुमारास इथे ओशाळला मृत्यू या नाटकातल्या "संभाजी"च्या पात्रासाठी अभिनेत्याच्या शोधात असलेल्या पणशीकरांना पवारांचा अभिनय व व्यक्तिमत्त्व भूमिकेसाठी पसंत पडले आणि त्यांनी पवारांना त्या नाटकातली संभाजीची भूमिका सोपवली []. त्यानंतर त्यांना कृष्णा पाटील दिग्दर्शित 'एक माती अनेक नाती' या चित्रपटात नायकाचे काम मिळाले आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली.

अरे संसार संसार, शापित, मर्दानी, बिनकामाचा नवरा, गुपचूप, सर्जा, वजीर, जावयाची जात अशा काही चित्रपटांमध्ये नायक तसेच खलनायक आणि, इथे ओशाळला मृत्यू', निष्कलंक', अश्रूंची झाली फुले', वीज म्हणाली धरतीला', पाखरू' अशा काही नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी काम केले.

निधन

कुलदीप पवार यांचे २४ मार्च, इ.स. २०१४ रोजी वयाच्या ६४व्या वर्षी मूत्रपिंडांच्या आजाराने निधन झाले[]. निधनाअगोदर दोन दिवसांपूर्वीच त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

कुलदीप पवार यांची भूमिका असलेली नाटके(कंसात पात्राचे नाव)

  • अशी मी तशी मी (स्थापत्यविशारद)
  • अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव)
  • असाही एक औरंगजेब (औरंगजेब)
  • आनंद (डॉक्टर)
  • आव्हान (चोर)
  • इथे ओशाळला मृत्यू (संभाजी)
  • एन्काउंटर
  • गोलमाल (इन्स्पेक्टर)
  • जरा वजन ठेवा (न्यायाधीश)
  • तीन लाखांची गोष्ट (चोर)
  • तुझी वाट वेगळी (युवराज)
  • नकटीच्या लग्नाला(यक्ष)
  • निष्कलंक
  • पती सगळे उचापती
  • पाखरू (दादा)
  • प्रश्न थोडा नाजुक आहे (कॅप्टन)
  • रखेली (रावसाहेब)
  • लग्नाची बेडी (डॉ. कांचन)
  • वीज म्हणाली धरतीला (तात्या टोपे)
  • शिवसंभव
  • होनाजी बाळा (उदाजीराव)

कुलदीप पवार यांची भूमिका असलेले चित्रपट

  • अरे देवा
  • अरे संसार संसार
  • आई तुळजा भवानी
  • आई थोर तुझे उपकार
  • आली लहर केला कहर
  • एक माती अनेक नाती
  • कलावंतीण
  • कुंकवाचा टिळा
  • गुपचूप
  • गोष्ट धमाल नाम्याची
  • जावयाची जात
  • तोतया आमदार
  • देवाशपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही
  • नेताजी पालकर
  • पायगुण
  • पैजेचा विडा
  • प्रेमासाठी
  • बिन कामाचा नवरा
  • भारतीय
  • मर्दानी
  • वजीर
  • शापित
  • संसार पाखरांचा
  • सुदर्शन
  • काळुबाईच्या नावानं चांगभलं
  • दुर्गा म्हणत्यात मला

संदर्भ व नोंदी

  1. ^ "अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन". २८ मार्च, इ.स. २०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "कुलदीप पवार यांचं निधन". 2014-03-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च, इ.स. २०१४ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कुलदीप पवार चे पान (इंग्लिश मजकूर)