कुर्द लोक
کورد | |
---|---|
एकूण लोकसंख्या | |
लक्षणीय लोकसंख्या असलेले प्रदेश | |
तुर्कस्तान | अंदाजे १.२-१.६ कोटी १५.७-२५%[१] |
इराण | अंदाजे ३३.५-८० लाख ५-१०%[१] |
इराक | अंदाजे ४०-६५ लाख १५-२३%[१] |
सीरिया | अंदाजे १३-२५ लाख ६-१५% |
भाषा | |
कुर्दी आणि झाझा-गोरानी | |
धर्म | |
इ.स.च्या ७व्या शतकापासून बहुशः इस्लाम (सुन्नी, शिया आणि सूफी) आणि अल्पशः झोराष्ट्रियन, याझ्दान, ज्यू आणि ख्रिश्चन आदी धर्मांचे | |
संबंधित वांशिक समूह | |
इतर इराणी लोक |
कुर्द (कुर्दी: کورد कुर्द), म्हणजेच कुर्द लोक (कुर्दी: گەلێن کوردی गेलेन कुर्दी) हा मध्य पूर्वेतील एक वांशिक समूह असून, या लोकांची वस्ती पूर्व व आग्नेय तुर्कस्तान (उत्तर किंवा तुर्की कुर्दिस्तान), पश्चिम इराण (पूर्व किंवा इराणी कुर्दिस्तान), उत्तर इराक (दक्षिण किंवा इराकी कुर्दिस्तान) आणि उत्तर सीरिया (पश्चिम कुर्दिस्तान किंवा रोजावा) या देशांच्या राजकीय सीमांनी विभागलेल्या एकसलग पट्ट्यात पसरली आहे. सांस्कृतिक आणि भाषिक दृष्ट्या कुर्द लोक इराणी लोकांशी संबंधित मानले जातात [२].
संदर्भ
- ^ a b c d वर्ल्ड फॅक्टबुक. 2013-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-25 रोजी पाहिले.
- ^ जॉन ए. शूप तृतीय (John A. Shoup III). एथ्निक ग्रुप्स ऑफ आक्रिका ॲंड द मिडल ईस्ट: ॲन एन्सायक्लोपीडिया (Ethnic Groups of Africa and the Middle East: An Encyclopedia) (इंग्लिश भाषेत). p. १५९.CS1 maint: unrecognized language (link)