कुमुदिनी रांगणेकर
कुमुदिनी रांगणेकर - (माहेरच्या कुमुदिनी शंकर प्रभावळकर), (जन्म : २५ मार्च १९०६; - ) या एक मराठी कादंबरीकार व रहस्यकथा लेखिका होत्या. त्यांनी केलेले '``मिल्स ॲन्ड बून' प्रकारातल्या अनेक कादंबऱ्यांचे अनुवाद मराठीतील प्रसिद्ध दिवाळी अंकांतून, आणि 'नवल' मासिकातून दरमहा, १७-१८ वर्षे प्रकाशित होत असत.
श्री. मुसळे ह्या प्रकाशकांनी त्यांच्या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशित करण्यासाठी मुद्दाम ‘राजेश प्रकाशन’ सुरू केले. त्यांनी कुमुदिनी रांगणेकरांच्या घायाळ हरणी, पत्त्यातली राणी, पाऊलवाटेचं वळण, प्रीतीच्या पंखाविना पाखरू, साद-प्रतिसाद, आदी २० कादंबऱ्या छापल्या.
रांगणेकरांनी काही हिंदी कादंबऱ्यांचेही मराठी अनुवाद केले आहेत.
रांगणेकरबाईंची मख्मली वल्ली ही बालकुमारांसाठीची साहस कादंबरी Baroness Orczy हिने लिहिलेल्या Beau Bracade या कादंबरीचा अनुवाद आहे. 'लांडा कारभार' हा पी.जी. वुडहाऊसच्या कादंबरीचा अनुवाद आहे.
कुमुदिनी रांगणेकर यांची प्रकाशित पुस्तके
|
|
|
|