Jump to content

कुमुदबेन जोशी

Kumud Ben Joshi (es); কুমুদ বেন জোশী (bn); Kumud Ben Joshi (fr); Kumud Ben Joshi (ast); Кумудбен Джоши (ru); Kumud Ben Joshi (yo); Kumud Ben Joshi (de); କୁମୁଦବେନ ଯୋଶୀ (or); Kumud Ben Joshi (ga); Kumud Ben Joshi (sl); کمود بین جوشی (ur); Kumud Ben Joshi (ca); Kumud Ben Joshi (hu); കുമുദ്ബെൻ മണിശങ്കർ ജോഷി (ml); Kumud Ben Joshi (nl); ᱠᱩᱢᱩᱫᱽᱵᱮᱱ ᱡᱳᱥᱤ (sat); कुमुदबेन जोशी (hi); ಕುಮುದಾಬೆನ್ ಜೋಶಿ (kn); ਕੁਮੁਦ ਬੇਨ ਜੋਸ਼ੀ (pa); Kumud Ben Joshi (en); కుముద్‌బెన్ జోషీ (te); कुमुदबेन जोशी (mr); குமுத்பென் மணிசங்கர் ஜோஷி (ta) política india (es); femme politique (fr); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); भारतीय राजकारणी (mr); سیاست‌مدار هندی (fa); Indiaas politica (nl); política india (ast); भारतीय राजनीतिज्ञ (hi); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); ਭਾਰਤੀ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa); Indian National Congress politician (en); سياسية هندية (ar); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); இந்திய அரசியல்வாதி (ta) Kumudben Manishankar Joshi (en); కుముద్‌బెన్ మణిశంకర్ జోషీ (te); Кумуд Бен Джоши (ru)
कुमुदबेन जोशी 
भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजानेवारी ३१, इ.स. १९३४
ब्रिटिश राज
मृत्यू तारीखमार्च १४, इ.स. २०२२
नागरिकत्व
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

कुमुदबेन मणिशंकर जोशी (३१ जानेवारी १९३४ - १४ मार्च २०२२) या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राजकारणी होत्या. भारतीय केंद्रीय मंत्रीमंडळात त्या दोन वेळा उपमंत्री होत्या.

कारकीर्द

कुमुदबेन जोशी गुजरात काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या. त्या १५ ऑक्टोबर १९७३ ते २ एप्रिल १९७६, ३ एप्रिल १९७६ ते २ एप्रिल १९८२ आणि ३ एप्रिल १९८२ ते २५ नोव्हेंबर १९८५ असे तीनवेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या. ह्या काळात त्या माहिती आणि प्रसारण उपमंत्री (ऑक्टोबर १९८० - जानेवारी १९८२) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण उपमंत्री (जानेवारी १९८२ - डिसेंबर १९८४) होत्या. []

२६ नोव्हेंबर १९८५ ते ७ फेब्रुवारी १९९० पर्यंत त्या भारताच्या आंध्र प्रदेश राज्याच्या राज्यपाल होत्या. शारदा मुखर्जी यांच्यानंतर त्या राज्याच्या दुसऱ्या महिला राज्यपाल होत्या. []

पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच, त्यांनी राज्यातील सर्व २३ जिल्ह्यांमध्ये आणि बऱ्याचदा बाहेरचा प्रवास करून एक प्रकारचा विक्रम रचला, जो हैदराबादच्या राजभवनात गेल्या १३ राज्यपालांपेक्षा जास्त सक्रियतेचा होता. २६ नोव्हेंबर १९८५ ते ३० सप्टेंबर १९८७ या कालावधीत त्यांनी १०८ वेळा सर्व जिल्ह्यांमध्ये तर २२ वेळा राज्याबाहेर प्रवास केला. , तत्कालीन मुख्यमंत्री एन.टी. रामाराव आणि त्यांच्या तेलुगू देशम पक्षकारांनी याकडे जोशींचा काँग्रेसचा मजबूत पाया निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले.[]

वाद

जोशी यांना त्यांच्या राजभवनाच्या कार्यकाळात सत्ताधारी तेलगू देसम पक्षाकडून (टीडीपी) टीका झाल्या. त्यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड मधील भाषणावर बरेच टीडीपी नेते नाखूश होते. यासंदर्भात रामारावांनी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांना पत्र लिहिले व "काँग्रेस एजंट" असल्याचा आरोप केला. हिंदीतील त्यांच्या २० मिनिटांच्या भाषणात जोशी म्हणाल्या: "विकास कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत केंद्र सरकारच्या पाठिंब्याशिवाय कोणतेही राज्य प्रगती करू शकणार नाही." त्यांनी निदर्शनास आणून दिले की केंद्र सरकारने विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पावर दररोज ४ कोटी रुपये खर्च केले आणि अन्नधान्याच्या वितरणासाठी ७५ पैसे ते १ रुपये अनुदान दिले.

टीडीपी नेत्यांनी जोशी फक्त केंद्राच्या योजनांवर लक्ष वेधतात असा आरोप केला. जोशी यांनी हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांना अनेक मुलाखती देऊन प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी हे आरोप "बकवास" आहेत असे सांगितले आणि म्हणाल्या, "अशा टीकेला प्रत्युत्तर देणे माझ्या सन्मानाच्या खाली आहे." []

मृत्यू

१४ मार्च २०२२ रोजी, वयाच्या ८८ व्या वर्षी, नवसारी जिल्ह्यातील गानदेवीजवळील चांगा धानोरी गावात त्यांचे निधन झाले. [] []

संदर्भ

  1. ^ "Worldwide Guide for women leadership". Guide2womenleaders. 21 December 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Former Governors of Andhra Pradesh". National Informatics Centre. 3 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 December 2012 रोजी पाहिले.
  3. ^ Menon, Amarnath (२९ फेब्रुवारी १९८८). "Andhra Pradesh Governor Kumudben Manishanker Joshi faces censure". १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  4. ^ Stefaniak, B.; Moll, J.; Sliwiński, M.; Dziatkowiak, A.; Zaslonka, J.; Chyliński, S.; Leśniak, K.; Iwaszkiewicz, A.; Iljin, W. (1977). "[Development of technics employed in extracorporeal circulation in the years 1961-1976 in the light of 1,200 cases]". Kardiologia Polska. 20 (3): 247–250. ISSN 0022-9032. PMID 328977.
  5. ^ "Telangana Guv pays homage to Kumudben Joshi". United News of India (इंग्रजी भाषेत). 2022-03-16 रोजी पाहिले.
  6. ^ "ગુજરાતમાંથી પ્રથમ મહિલા રાજ્યપાલ બનેલા કુમુદબેન જોષીનું અવસાન". Gujarat Samachar (गुजराती भाषेत). 2022-03-15. 2022-03-16 रोजी पाहिले.