कुमामोटो किल्ला
कुमामोटो किल्ला | |
---|---|
熊本城 | |
चोउ-कु, कुमामोटो, कुमामोटो प्रांत, जपान | |
प्रकार | अझुची मोमोयामा किल्ला |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित | इडेता कुळ (१४६९ – १४९६) कानोकोगी कुळ (१४९६ – १५५०) जोउ कुळ (१५५० – १५८७) सस्सा कुळ (१५८७ – १५८८ ) काटो कुळ (१५८८ – १६३२) होसोकावा कुळ (१६३२ – १८७१) जपान (१८७१ – सध्या) |
परिस्थिती | १९६० आणि १९९८ - २००८ मध्ये पुनर्बांधणी केली [१] २०१६ मधील कुमामोटो भूकंपांमुळे झालेल्या नुकसानीनंतर सध्या दुरुस्ती सुरू आहे. |
Site history | |
बांधले | |
याने बांधले | |
सध्या वापरात | १४६७ - १८७४ [१] - १९४५ (सैन्य तळ म्हणून) |
साहित्य | लाकूड, दगड, मलम, टाइल |
उध्वस्त झालेले | १८७७ (सत्सुमा विद्रोह) [१] |
लेखन त्रुटी:"infoboxTemplate" ही क्रिया अस्तित्वात नाही. |
कुमामोटो किल्ला (熊 本 城 कुमामोटो-ज्यू) हा एका टेकडीवरील जपानी किल्ला आहे जो कुमामोटो प्रांताच्या कुमामोटोच्या चो-कु येथे आहे. [१] हा एकेकाळी मोठा आणि सुरक्षित किल्ला होता. या किल्ल्यातील कोठागार (天 守 閣 टेनसुकाकू) हे १९६० मध्ये कॉंक्रीटने पुनः बांधण्यात आले होते, पर्ंतु किल्ल्यातील ईतर लाकडी इमारती मुळ तटबंदीपासून तश्याच आहेत. हिमाजी किल्ला आणि मत्सुमोतो किल्ल्यासमवेत कुमामोटो किल्ला जपानमधील तीन प्रमुख किल्ल्यांपैकी एक मानला जातो. [२] किल्ल्याच्या परिसरातील तेरा संरचनांना महत्त्वाच्या सांस्कृतिक वारस्याच्या यादीत गणल्या जातात. [१]
इतिहास
इमाता हिडेनोबू यांनी तटबंदीची स्थापना इ.स. १४६७ मध्ये केली तेव्हा पासून कुमामोटो किल्ल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. इ.स. १४९६ मध्ये, या तटबंदीचा विस्तार कनोकोगी चिककाझूने केला. इ.स. १५८८ मध्ये, कॅटा कियोमासा कुमामोटो किल्ल्याच्या मुळ तटबंदीत फेरफार केली. इ.स. १६०१ ते १६०७ पर्यंत किओमासाने किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि त्यात ४९ बुर्ज, १८ बुर्ज वेशी आणि २९ छोटे दरवाजे बांधले. काही काळानंतर किल्ल्यात एक मनोरा बांधण्यात आला, त्यात विहीर आणि स्वंयपाकघर अशा अनेक सुविधा होत्या. इ.स. १६१० मध्ये होनमारू गोटेन पॅलेस पूर्ण झाला. किल्ल्याचा परिसर पूर्वेकडून पश्चिमेस साधारणतः १.६ किलोमीटर (०.९९ मैल) लांब आणि उत्तरेकडून दक्षिणेस १.२ किलोमीटर (०.७५ मैल) लांब पसरलेला आहे. किल्ल्यातील कोठागार ३०.३ मीटर (९९ फूट) उंच आहे.
इ.स. १८७७ मध्ये सत्सुमा बंडखोरी दरम्यान किल्ल्याला वेढा घातला होता, आणि त्या लढाईत कोठागार आणि इतर भाग जळून खाक झाले होते. किल्ल्याच्या परिसरातील १३ इमारती अबाधित होत्या, आणि सध्या त्यांना महत्त्वपूर्ण सांस्कृतिक यादीत स्थान दिले आहे. इ.स. १९६० मध्ये, कोठागार कॉंक्रिटच्या सहाय्याने पुन्हा बांधण्यात आले. इ.स. १९९८ ते २००८ पर्यंत, किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम झाले, त्या दरम्यान १७ व्या शतकातील बहुतेक संरचना पुन्हा तयार केल्या. हल्लेखोरांना किल्ल्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, मुशा-गेशी तसेच लाकडी ओव्हरहॅंग्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी पाट्या बनविल्या गेल्या. त्याकाळी दगडांचा वापर हल्लेखोरांना रोखण्यासाठी होत असे. येथून जवळच सॅन-नो-मारू नावाची बाग आहे. हे होसोकावा कुळाचे पूर्वीचे निवासस्थान होते. येथे ईडो कालावधीत हिगो प्रांताचे सुभेदार रहात होते. या पारंपारिक लाकडी हवेलीच्या आवारात एक सुप्रसिद्ध जपानी बाग आहे.
इ.स. २००६ मध्ये, जपान कॅसल फाऊंडेशनने कुमामोटो कॅसलला जपानच्या १०० उत्तम किल्ल्यांच्या यादीत सूचीबद्ध केले होते. ७ डिसेंबर २००७ रोजी किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. २० एप्रिल २००८ रोजी जीर्णोद्धाराचा सार्वजनिक कार्यक्रम झाला.
कुमामोटो प्रांतातील माशिकी शहरात १४ एप्रिल २०१६ रोजी रात्री ९:२६ वाजता झालेल्या भूकंपात किल्ल्याचे मोठे नुकसान झाले. हा भूकंप १८८९ च्या कुमामोटो भूकंपासारखाच होता, तेव्हाही किल्ल्याचे नुकसान झाले होते. किपच्या पायथ्याशी असलेली दगडी भिंत अर्धवट कोसळली होती. किल्ल्याच्या छतावर लावलेले शशीहोको दागिने पडले आणि तुटले. दुसऱ्या दिवशी १५ एप्रिल रोजी आलेल्या ७.३ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्याचे आणखी मोठे नुकसान झाले आणि त्याचे काही भाग पूर्णपणे नष्ट झाले. किल्ल्यातील कीप बऱ्याच भूकंपातून वाचलेला भाग आहे. [३] या भुकंपात किल्ल्याचे दोन बुरुज मोठ्याप्रमाणात खराब झाले आणि अर्धवट कोसळले, किपाच्या पायथ्याशी असलेल्या बाह्य भिंतींपैकी बरेच भाग कोसळले आणि किपच्या छतावरील फरशा देखील विस्कळीत झाल्या आणि छतावरून खाली पडल्या.
संदर्भ
- ^ a b c d e f g h i j k l m n o O'Grady, Daniel. "Kumamoto Castle – 熊本城". Japanese Castle Explorer. 2018-05-01 रोजी पाहिले.
- ^ "The Three Famous Castles of Japan". Kobayashi Travel Service. 2018-05-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-01 रोजी पाहिले.
- ^ "Damaged Kumamoto Castle actually withstood the earthquake just as ancient architects intended". Spoon & Tamago. 2016-04-15. 2018-05-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-01 रोजी पाहिले.