Jump to content

कुणबी

कुणबी मराठा (कृषी करणारे क्षत्रिय)' ही महाराष्ट्रातील शेती करणारी मराठा शेतकरी जमात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात.

कुणबी मराठा ची व्याख्या:- जो मराठा शेतमजुरी करून घर चालवतो तो कुणबी मराठा.

अंबी खोऱ्यातल्या भरपूर पावसाच्या डोंगरी मुलुखातल्या अगदी साध्या रचनेच्या समाजात कुणबी आणि धनगर गवळ्यांच्या लहान लहान वस्त्या होत्या. बहुतेक वस्त्यांच्यात केवळ एक एक गोतावळ्यातले लोक रहात होते. कुणबी आंबीच्या काठी भात शेती आणि खालच्या डोंगर उतारांवर १५ वर्षाच्या चक्रातली फिरती कुमरी शेती करायचे. ते केवळ शेतीच्या कामासाठी थोडेसे बैल-गायी सांभाळायचे. त्या गायी फारसे दूध द्यायच्या नाहीत. त्यांच्या प्रथिनांच्या गरजा भागवण्यासाठी ते डोंगरात भरपूर संख्येने आढळणाऱ्या भेकर, रान डुक्कर, सायाळ आणि घोरपडींची शिकार करायचे. धनगर-गवळी डोंगरात वरवरच्या पठारांवर आणि सड्यांवर राहायचे. म्हशी आणि गायींचे मोठमोठे कळप पाळणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. पुण्याला दूध पुरवणे सुरू व्हायच्या आधी ते बहुतेक सर्व दुधाचे ताक करायचे, घरीच ताक प्यायचे आणि धान्याच्या बदली कुणब्यांना लोणी द्यायचे. अल्पप्रमाणात ते वरच्या डोंगर उतारांवर कुमरी शेती करायचे. ताकातून भरपूर प्रथिन मिळत असल्याने ते फारशी शिकार करायचे नाहीत. एकूण कुणबी नदीकाठी आणि खालच्या डोंगर उतारावरची शेती आणि पुऱ्या डोंगरात शिकार करायचे. धनगर-गवळी वरच्या डोंगर उतारांवर शेती आणि पशुपालन करायचे; फारशी शिकार करत नसत. नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या संदर्भात या दोन समाजांची भूमिका अगदी वेगळी वेगळी होती किंवा परिसर शास्त्राच्या परिभाषेत एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या या दोन हिंदू जातींची परिभूमिका पूर्णपणे वेगळी वेगळी होती. या परंपरागत व्यवस्थेत विशिष्ट संसाधनांवर या दोन गटांची आपापली मक्तेदारी होती, आणि ही मक्तेदारी टिकून राहील अशी शाश्वती असताना ते गट आपापली संसाधने काळजीपूर्वक सांभाळून संयमाने वापरत होते. आम्ही अभ्यास केला त्या वेळी धरण आणि त्यातून बाहेरच्या समाजाशी संपर्क आल्याने ही परंपरा व व्यवस्था कोलमडून पडायला लागली होती.[]

मराठवाडा, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, तसेचविदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे ३२% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.

कुणबी
एकुण लोकसंख्या
ख़ास रहाण्याची जागा
भारत ध्वज India

महाराष्ट्र, गोवा तसेच मध्य प्रदेश

भाषा
  • मराठी
  • कोंकणी
[]
धर्म
हिंदू (क्षत्रिय)
चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी, ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती. कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशीहि या जातींची नावे आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणे होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी- कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता व्यवसाय होता. ती नंतर जात झाली. कुनब्यांची लोकसंख्या मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्यात सुद्धा आहे

वैदर्भीय कुणबी

महाराष्ट्रातील विदर्भ ह्या भागात बहुजातीय कुणबी राहतात. कुणबी ही जात नसून तो जातींचा समूह म्हणून मानल्या जातो. कुणबिकी (शेती) करतो तो त्याला कुणबी म्हटल्या जायचे. विदर्भात ९६ कुळी मराठा समाज हा कागदोपत्री कुणबी आहे. हा समाज मुख्यातात बुलढाणा अकोला वाशीम अमरावती येथे बहुसंखेने आहे. तर इतर जातीय कुणबी जसे तिरळे कुणबी, झाडे कुणबी, जाधव कुणबी, खैरे कुणबी, बावणे कुणबी, वाडेकर कुणबी, वंजारी कुणबी, राजपूत कुणबी, धनगर कुणबी हा समाज प्रामुख्याने अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा,गोंदिया ह्या भागात आहेत. ह्या कुणबी जाती आपापसात बेटी व्यवहार करत नाहीत.

मराठा कुणबी

कुणबी मराठा व्याख्या:- जो मराठा शेतमजुरी करून घर चालवतो तो कुणबी मराठा.

पंजाबराव देशमुखांच्या परिषदेनंतर हा समाज कागदोपत्री "कुणबी" अशी नोंद करतो

तिरळे कुणबी समाज

विदर्भात इतर कुणबी पेक्षा बहुसंख्य हे तिरळे कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे जे ९६ कुळी मराठा आहे तेच विदर्भात तिरळे कुणबी होय. तिरळे हे मराठा साम्राज्यात सरदार, जहागीरदार, सरंजामदार, देशमुख, पाटील होते. इंग्रज साम्राज्याचा उदय होऊन, मराठा साम्राज्याचा अस्त झाल्याने यांना आपल्या मूळ शेती व्यवसायाकडे वळावे लागले. तिरळे व ९६ कुळी मराठा हे भिन्न नसून एकच असल्याने यांच्यात सुरुवाती पासूनच वैवाहिक संबंध होतात. यांच्यात विधवा पुनर्विवाहाला निषेध आहे. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर येथे हे बहुसंख्य असून चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे कमी प्रमाणत आहे.

खैरे कुणबी

खैरे कुणबी हा समाज वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्यात मुख्यता आढळून येतो. मुख्यता यांचा व्यवसाय शेती व इतर शेती संबंधित व्यवसाय आहे. प्राचीन काळात खैराच्या झाडापासून काथ काढणे व शेती करणे हा मुख्य व्यवसाय होते.मध्य भारतात हजारो वर्षापासून चालेल्या लढाई युद्धात या समाजाचा सहभाग होता.नागपूर चे भोसले तसेच निझाम व इतर सम्राज्यासाठी खैरे कुंब्यानी देशमुखाई गोळा करण्याचा हक्क मिळाला होता. त्यामुळे हा समाज मध्यप्रदेश,छत्तीसगढ व विदर्भात पसरला. आजही विदर्भातील अनेक गावात खैरे कुणबी जातीची दोन चार घरे आढळून येतात, या मागील कारण म्हणजे निझाम आणि भोसले शाहीत या समाजाने देशमुखी गोळा करण्याचे काम केले.त्यात अनेक खैरे कुणबी लोकांना देशमुख आडनाव प्राप्त झाले.अनेकांना पाटीलकी मिळाली. हा समाज मुख्यतो आज ही गावातील पाटील पद भूषवतो.इतर कुणबी पोट जाती पेक्षा खैरे कुणबी समाजाची संख्या विदर्भात कमी आहे.वाघोबा,धर्मराया,हनुमान, महादेव इ. कूलदैवत म्हणून पूजन केल्या जाते.मांसाहार केल्या जात नाही. बैलजोडी शर्यत प्रौढ पुरुषांचा प्राचीन काळापासून प्रसिद्ध खेळ आहे.बैलपोळा सोबतच इतर सर्व हिंदू सण उत्सव साजरे केले जातात.सर्व पुरुष महिलांच्या हातात आज ही धागा बांधल्या जाते व टिळा लावल्या जाते

घाटोळे कुणबी

घाटोळे कुणबी हे मराठा साम्राज्यातील एक प्रस्थापित समाज आहे .मराठा साम्राज्यातील विविध ठिकाणी पाटील की भोगलेले आहे. या समाजातील मराठा साम्राज्यामध्ये बहुतांश लोक सरसेनापती, सेनापती आणि उच्च पदावर कार्यरत असलेले इतिहासामध्ये पाहायला मिळेल. आणि सध्या हा समाज विदर्भ ,मराठवाडा यात खूप जास्त व्यापलेला आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण संस्था , व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये ते उच्च स्थानी आहे.

खेडूले कुणबी

विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील ही प्रमुख कुणबी पोट जात असून प्रमुख व्यवसाय शेती आहे.इतर कुणबी पोट जातीच्या तुलनेत हा समाज मागास आहे. मुलांचे सरासरी लग्नाचे वय २१-२५ वर्ष आहे तर मुलींचे १८-२१ वर्ष आहे. राजकीयदृष्ट्या ही कुणबी पोट जात मजबूत असूनही सामाजिक स्थितीत मागास आहे. धर्मराया,हनुमान,वाघोबा ई. कुळदैवत म्हणून पुजल्या जाते.मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो. पोळा प्रमुख सण असून शैवपंथाचा प्रभाव जाणवतो.

कोकणी कुणबी समाज

कोकणातील कुणबी समाज हा वैदर्भीय कुणबी समाजापेक्षा भिन्न आहे. विदर्भासारखा कोकणातील कुणबी समाज हा बहुजातीय नाही. कोकणातील कुणबी समाजात मुख्यत्वे तील्लोरी कुणबी ही जात दिसून येते. कोकणातील तील्लोरी आणि विदर्भाचे तिरळे ह्यात जरी शब्दसाम्य दिसत असेल, परंतु हे दोन्ही समाज भिन्न आहे. कोकणात कुणबी आणि मराठा समाज हे वेगळे समजल्या जातात. किनारपट्टीवर निवास असल्यामुळे कोकणी-कुणबी हे बहुतांश मांसाहारी आहेत. त्यांच्या आहारात मासे आणि भात हा महत्वाचा घटक असतो.

हे सुद्धा पाहा

बाह्य दुवे

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ The Tribes and Castes of Bombay, vol.2, by R. E. Enthoven.