कुडे खुर्द
?कुडे खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खेड |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | जयमाला वसंत मोरे |
[[]] | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +०२२ • एमएच/14 |
कुडे खुर्द हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
==लोकजीवन== महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या विस्तीर्ण डोंगर रांगांमधील असलेले उंच शिखर शिंगेश्वर हे असून या शिंगेश्वराच्या पायथ्याशी असलेले कुडे खुर्द हे छोट्या वस्तीचे गाव" नजीकच सहा कोस अंतरावर असलेले महाराष्ट्रातील शेकरू खारीसाठी प्रसिद्ध असलेले भीमाशंकर अभयारण्य व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग हा लाभलेला देव ऋषीमुनींचा वसा, उंच डोंगर व घनदाट असे काही कोस अंतरावर असलेले अभयारण्य यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.येथे घनदाट जंगल,झाडी, दऱ्याखोऱ्याने नटलेल्या विस्तीर्ण डोंगराळ प्रदेश व याच डोंगर रांगांमध्ये वसलेल्या लहान मोठ्या गाव-वस्त्या येथील लोक निसर्गरम्य परिसरात असल्याने आनंदी व निरोगी जीवन जगत आहे, त्यांची संस्कृती, कला, नृत्य , गाव गाडे, सार्वजनिक यात्रा, व प्राणीमात्राविषयी असलेले प्रेम.
या गावांमधील किंवा नजीकच्या क्षेत्रातील असलेला मुख्य व्यवसाय शेती व शेती बरोबर पाळीव प्राणी व त्यापासून दूध निर्मिती दुग्ध व्यवसाय काही प्रमाणात मजुरी उच्च विचारसरणी व सर्वसाधारण जीवन, तरुण वर्ग हा मोठ्या संख्येने उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहराच्या म्हणजे पुणे किंवा मुंबई या ठिकाणी स्थायिक झालेला आहे गावाकडे लहान मोठ्या प्रमाणात गावाची ओढ व आवड असलेली किंवा जाणती मंडळी ही रहिवासासाठी आहेत गावात शिक्षण हे पहिली ते पाचवी इयत्ते साठी आहे गावात होणारे व सर्व समाजकार्य एकत्र येऊन होणारे उत्सव हे सर्व साधारणपणे फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या काळामध्ये ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या उत्सवानिमित्त सात दिवस हरिनाम सप्ताह व आठव्या दिवशी भैरवनाथाचा पालखीचा व बैलगाडा शर्यतीचा आणि तरुण मंडळी यांचा क्रिकेट स्पर्धा असा सहग्राम नियोजित कार्यक्रम पार पडतात गावात आनंदीमय वातावरण असते एकतेचा व सामूहिक कार्याचा असा एक संदेश यामधून लोकांना व तरुण पिढीला मिळतो
==प्रेक्षणीय स्थळे== गावांमधील असलेले ग्रामदैवत भैरवनाथाचे भव्य असे मंदिर 🏰 व जवळच असलेले शिंगेश्वरचे उंच असे शिखर ⛰️ आणि सहा कोस अंतरावर असलेले महाराष्ट्र राज्यातील शेकरूखार 🐿️ या वन्यजीव राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले भीमाशंकर अभयारण्य 🏞️ आणि हेच प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग 🛕 हे नजीकचे प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
==जवळपासची गावे== जवळील अंतरावर असलेले गावे पुढील प्रमाणे:
कुडे खुर्द, कुडे बुद्रुक, येनवे बुद्रुक, येणवे खुर्द औदर, देवशी, खरपुड, परसुल, वाजवणे, पाईट, कडूस, वाडा, चिखलगाव, घोटवडी, डेहने, वाळद