कुडा लेणी
कुडा लेणी | |
---|---|
स्थान | रायगड |
18°17′12.0516″N 73°4′19.1892″E / 18.286681000°N 73.071997000°E | |
शोध | तिसरे शतक |
गुहा दर्शवा | २६ लेणी |
प्रकाशयोजना | नैसर्गिक |
कुडा लेणी मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईपासून १३० कि.मी. तर माणगावच्या आग्नेयस २१ कि.मी. कुडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. येथील समुद्रकिनाऱ्याजवळील टेकडीत २६ कोरीव लेण्याचा समूह कोरलेला आहे.(मुरुड-जंजिऱ्यापासून जवळ)
निर्मिती
या लेण्यांची पहिली नोंद इ.स. १८४८ सालची सापडते. लेणीपर्यंत जाण्याकरिता राजापुरी येथील खाडी ओलांडून जावे लागते म्हणून खूप वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती. लेणीजवळ मांदाड बंदर आहे. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी सांगितलेले मॅंडागोरा बंदर. मांदाड येथील उत्खननात सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची विटा व खापरे सापडले आहेत.हे सातवाहन साम्राज्यात महाभोजांच्या मांदव घराण्याचे केंद्र होते.
रचना
ही लेणी दोन टप्प्यात कोरलेली आहे. क्र. १ ते १५ खालील स्तरात १६ ते २६ ही लेणी वरील स्तरात आहेत. यात बौद्ध मूर्ती इ.स. ६ शतकामध्ये स्थापिल्या गेल्या आहेत. लेणीतील २६ गुहांपैकी ४ चैत्यगृहे आढळतात.[१]
कसे जाल ?
रोहा रेल्वे स्टेशनपासून २४ कि.मी. कुडा गाव आहे. बसने मुरुडपर्यंत जावे तेथून कुडा २४ कि.मी. आहे.