कुकू मोरे
कुकू मोरे | |
---|---|
कुकू मोरे | |
जन्म | १९२८ अज्ञात |
मृत्यू | ३० सप्टेंबर १९८१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कारकीर्दीचा काळ | १९४६ - १९६१ |
कुकू मोरे, किंवा कुकू (१९२८ - ३० सप्टेंबर १९८१) ही एक अँग्लो-इंडियन नर्तक आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री होती.[१] १९४० आणि १९५० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत कुकू ही चित्रपट नृत्याची राणी होती. तिला हिंदी चित्रपटाची "रबर गर्ल" म्हणून ओळखले जात असे आणि तिच्या प्रतिभेने १९४० आणि १९५० च्या दशकात बॉलीवूड चित्रपटांमध्ये कॅबरे नृत्य चित्रित करणे अनिवार्य मानले गेले होते.[२]
कारकीर्द
१९४६ मध्ये ‘अरब का सितारा’ या चित्रपटातून कुकूने पडद्यावर पदार्पण केले. स्टम चंडीमध्ये , दिग्दर्शक आणि प्रेक्षकांनी पहिल्यांदाच तिची नृत्य क्षमता मोठ्या प्रमाणात लक्षात घेतली. त्यानंतर मेहबूब खानचा १९४८ मधील हिंदी चित्रपट अनोखी अदा कुकूच्या कारकिर्दीतला एक मोठा मैलाचा दगड ठरला. अनोखी अदा या चित्रपटातील तिच्या नृत्याने ती तत्कालीन प्रमुख नृत्यांगना म्हणून प्रस्थापित झाली. नर्गीस दत्त, दिलीपकुमार आणि राज कपूर अभिनीत अंदाज या १९४९ च्या हिंदी चित्रपटात रोमँटिक नृत्य करणाऱ्या तिला मोठी संधी मिळाली. मेहबूब खानच्या १९५२ च्या टेक्निकलर चित्रपट आन मध्ये, जो तिचा पहिला रंगीत चित्रपट होता, तिने अदाकारी नृत्य करत आपली छप. पाडली. तिच्या कारकिर्दीतील आन आणि मयूरपंख अशा फक्त दोन रंगीत चित्रपटांमध्ये ती दिसली होती. ती एका डान्स नंबरसाठी ६,००० रुपये आकारत असे, जे की ५० च्या दशकात हेवा करण्याजोगे शुल्क होते आणि मुख्य अभिनेत्याला देखील तितके शुल्क दिले जात नसे.[३]
उतरती कारकीर्द
हेलन आणि वैजयंतीमाला यांसारख्या नर्तिका इंडस्ट्रीत येईपर्यंत कुकू ही हिंदी चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट नृत्यांगना होती. अँग्लो-बर्मीज नृत्यांगना आणि अभिनेत्री हेलन ही कुकूची कौटुंबिक सदस्य होती. हेलन आणि अभिनेता प्राण यांना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळवण्यात कुकूनेच मदत केली होती. १९५१ मधील शबिस्तान आणि आवारा सारख्या चित्रपटांमध्ये कोरस डान्सर म्हणून १३ वर्षांच्या हेलनला काम मिळवून दिले होते. तसेच प्राणला देखील जिद्दी चित्रपटात कुकू ने काम मिळवून दिले होते. चलती का नाम गाडी (१९५८) आणि याहुदी (१९५८) या चित्रपटात कुकू आणि हेलन विशेषतः एकत्र गाण्यात नृत्य करताना दिसल्या. १९६३ मधील 'मुझे जीने दो' हा तिचा शेवटचा चित्रपट होता, त्यानंतर ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली होती.
मृत्यू
१९६३ नंतर, कुकू गरिबी आणि हलाखीत जीवन जगू लागली. १९८० मध्ये तिला कर्क रोगाचे निदान झाले, पण गरिबी अशी होती की औषधांसाठी देखील तिच्याकडे पैसे नव्हते. योग्य उपचार न मिळाल्याने कुकूची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत गेली. १९८१ मध्ये, कुकूला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान ३० सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.[४]
निवडक चित्रपट सूची
चित्रपट | वर्ष | भूमिका |
---|---|---|
अनोखी अदा | १९४८ | स्टेज डान्सर |
विद्या | १९४८ | नर्तक |
अंदाज | १९४९ | शीला |
शायर | १९४९ | |
बरसात | 1949 | रुबी |
एक थी निशानी | 1949 | |
पतंगा | १९४९ | नर्तक |
सिंगार | १९४९ | |
बाजार | १९४९ | |
पारस | १९४८ | नर्तक |
दिलरुबा | १९५० | नर्तक |
आरजू | १९५० | नर्तक |
बेबस | १९५० | |
परदेस | १९५० | नर्तक/गायक |
हंसते आंसू | १९५० | |
हलचल | १९५१ | |
आवारा | १९५२ | बार डान्सर |
आन | १९५२ | |
लैला मजनू | १९५३ | |
मिस्टर आणि मिसेस 55 | १९५५ | गायक |
चलती का नाम गाडी | १९५८ | |
यहुदी | १९५८ | |
बस कंडक्टर | १९५९ | |
गर्ल्स हॉस्टेल | १९६२ | |
मुझे जीने दो | १९६३ |
संदर्भ
- ^ Rishi, Tilak (2012). Bless You Bollywood!: A tribute to Hindi Cinema on completing 100 years. Trafford Publishing. p. 240. ISBN 978-1-466-93962-2.
- ^ "Cuckoo's cineplot profile". 22 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2012 रोजी पाहिले.
- ^ Sandip Pal (20 August 2015). "Forgotten gems of Bollywood - The Times of India". The Times of India. 3 September 2016 रोजी पाहिले.
- ^ "इस हीरोइन के कुत्ते भी अलग गाड़ी में घूमते थे, आखिरी वक्त में दवा को भी नहीं थे पैसे". अमर उजाला. १० एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील कुकू मोरे चे पान (इंग्लिश मजकूर)