Jump to content

कुकडी प्रकल्प

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील कुकडी नदीवर येडगाव व माणिकडोह ही धरणे बांधली आहेत. मीना नदीवरील वडज धरण, आर नदीवरील पिंपळगाव जोगे धरण व घोड नदीवरील डिंभे धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिक‍अप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे.