कुकडी नदी
कुकडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
कुकडी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
कुकडी नदी ही महाराष्ट्रातील एक छोटी नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ किलोमीटर अंतरावर असलेल्या जीवधन किल्ल्याजवळील सह्याद्रिमाथ्यावरच्या कुकडेश्वर या ठिकाणी उगम झाला आहे. कुकडी नदी ही पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. जुन्नर तालुक्यातील नाणेघाटात तिचा उगम झाल्यानंतर ही नदी जुन्नर, लेण्याद्री, ओझर, शिरापूर,वडनेर बु॥, निघोज, शिरूर या मोठ्या गावांजवळून वाहत वाहत घोड नदीला मिळते.निघोज गावा जवळील जगप्रसिद्ध रंजणखळगे आणि शिरापूर येथील श्री.स्वयंभू सिद्धेश्वर प्राचीन मंदिर कुकडी नदीच्या तीरावर आहे.
उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे. ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेस असलेल्या येडगावजवळ मिळते.
कुकडी प्रकल्प
कुकडी नदीवरील येडगाव, माणिकडोह ही धरणे, मीना नदीवरील वडज धरण, पुष्पावती नदीवरील पिंपळगावजोगे धरण, घोड नदीवरील डिंभे धरण, मांडवी नदीवरील चिल्हेवाडी धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिकअप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे.
इतिहास
याच कुकडी नदीवर २२ नोव्हेंबर १७५१ मध्ये मराठे आणि निजाम सलाबतजंग यात लढाई झाली होती. ही लढाई 'कुकडीची लढाई' म्हणून ओळखली जाते.
पहा
जिल्हावार नद्या
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
आंबी नदी · इंद्रायणी नदी · कऱ्हा नदी · कुकडी नदी · घोड नदी · नाग नदी · नीरा नदी · पवना नदी · भामा नदी · मांडवी नदी · मीना नदी · मुठा नदी · मुळा नदी · मोसी नदी · वेळवंडी नदी |