कुंदापूर
कुंदापूर ಕುಂದಾಪುರ | |
भारतामधील शहर | |
कुंदापूर | |
देश | भारत |
राज्य | कर्नाटक |
जिल्हा | उडुपी जिल्हा |
क्षेत्रफळ | २३.०६ चौ. किमी (८.९० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | २६० फूट (७९ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ३०,४५० |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
कुंदापूर हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्याचे मुख्यालय व एक नगर आहे. हे गाव अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर मंगळूरच्या १५० किमी उत्तरेस स्थित आहे. येथील कुंदेश्वर मंदिरावरून ह्या गावाचे नाव कुंदापूर असे पडले आहे.
कुंदापूर राष्ट्रीय महामार्ग १७ वर स्थित असून ते कोकण रेल्वेवरील एक स्थानक आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी रोज धावणाऱ्या गाड्यांचा येथे थांबा आहे.