Jump to content

कुंदा

कुंदा तथा कारी (गुजराती:खावो; कन्नड: कणिग्यन हुळ्ळू; लॅटिन: इशिमम पायलोजम) हे ग्रॅमिनी कुलातीलवर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारे) ०·६ ते १· ५ मी. उंचीचे गवत आहे.

याची मुळे जमिनीत खोल जातात आणि अधश्चरांचे (ठोंबांचे) दाट जाळे जमिनीच्या मशागतीस अडथळे आणते. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत या गवताचा प्रसार सामान्य असून भारतात आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमहाराष्ट्रात सोलापूरअहमदनगर जिल्ह्यांमध्ये आढळते. सुपीक, काळ्या जमिनीत ते खूप वाढते. याला मार्च–ऑक्टोबर मध्ये फुले येतात व ती येण्यापूर्वी जनावरास चारण्यास हे गवत चांगले असते. जनावारांना ते सहसा आवडते. प्रायोगिक क्षेत्रात या गवताचे हेक्टरी सु. १,०९० किग्रॅ. उत्पादन करण्यात आलेले आहे. ते वाळवूनही वापरतात.