कुंडलिनी
कुंडलिनी (संस्कृत कुण्डलिनी, “वेटोळे असलेली”) ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची संकल्पना अाहे. ही दैवी ऊर्जा (किंवा शक्ती) पाठीच्या कण्याच्या तळाशी (मूलाधार नावाच्या चक्रात) वसलेली असते असे मानले जाते. ही संकल्पना शैव तंत्रामध्येही अाढळते. तिथे कुंडलिनीस दैवी स्त्रीत्वाशी संबंधित असलेली शक्ती मानले जाते. तांत्रिक अभ्यासानुसार ह्या ऊर्जेची जागृती झाल्यास आध्यात्मिक मुक्ती लाभते असे मानले जाते. शाक्तमतातील परादेवी वा आदि पराशक्ती या सर्वोच्च सत्तेशी अाणि भैरवी व कुब्जिका या देवींशी कुंडलिनीचा संबंध अाहे. अकराव्या शतकात ही संज्ञा तिच्याशी संबंधित अाचारांसह हठ योगामध्ये स्वीकारली गेली.
कुंडलिनी जागृती अनेक मार्गांनी झाल्याची वर्णने उपलब्ध अाहेत. योगाच्या अनेक शाखांमध्ये ध्यान, प्राणायाम, अासनाभ्यास वा मंत्रजपाद्वारे कुंडलिनी जागृतीचा प्रयत्न केला जातो. कुंडलिनी योगावर शाक्तवादाचा व तंत्रमार्गाचा प्रभाव अाहे. या योगाचे नावच मुळी मंत्र, तंत्र, यंत्र, आसने वा ध्यान यांच्या नियमित अभ्यासाद्वारे कुंडलिनी जागृतीवर लक्ष केंद्रित करण्यातून व्युत्पन्न झालेले आहे. [१]
पूर्व मार्ग व पश्चिम मार्ग
पूर्वेचिया मार्गे पश्चिमेचा तट, असे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात वर्णन येते.
०१) पूर्वेचिया मार्गानें म्हणजे कर्म करत राहून पश्चिमेचा तट-म्हणजे नैष्कर्म्यसिद्धि मिळविणें असा हा मार्ग आहे. असा एक अर्थ.
०२) काहीच्या मते मुलाधारचक्रापासून विशुद्ध चक्रापर्यंत कुंडलिनी- प्राणशक्ति आल्यानंतर ती पूर्व मार्गाने (राजयोगाने) एकदम आज्ञाचक्रावर नेणें हा पूर्वमार्ग होय.
आणि विशुद्ध चक्रापासून प्राणशक्ति हठयोगाने, कंठाच्या जागीं जालंधरबंध करून श्रीहाट, गोल्हाट, भ्रमरगुंफा या मार्गाने आज्ञाचक्रावर नेणें हा पश्चिम मार्ग. (पूर्वेचिया मार्गे पश्चिमेचा तट म्हणजे राजयोगाने आत्मचिंतनाने हठयोगाचे ही साध्य गाठले जाते असा भाव येथे आहे.) [२]
कुंडलिनी या विषयावरील मराठी पुस्तके
- कुंडलिनी: लेखक: योगीराज मनोहर हरकरे, वैदिक प्रकाशन