कुंकू
कुंकू हा हळदीचे चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग लाल असतो. याचा वापर देवपूजेत तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. [ चित्र हवे ]. कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. कुंकू ओले असल्यास त्यास गंध म्हणतात. असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. सुवासिक कुंकूही वापरात असते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.
पूर्वी कुंकू कपाळाला चिकटविण्यासाठी आधी मेण लावत.
करंडा
कुंकू ठेवण्यासाठी जे साधन वापरले जाते त्यास कंरडा असे म्हणतात.
कंरडा हा स्टेनलेस स्टील धातूचा किंवा चांदीचा असतो. काही करंड्यात कुंकू टेवण्यासाठी चार लहान आकाराच्या वाट्या एकमेकांस जोडलेल्या असतात व वरती त्याला पकडण्यासाठी सरळ व गोलाकाराचे कडी असते. वाट्यांचा उपयोग कुंकू व हळद ठेवण्यासाठी होतो.
उत्पादन
कुंकवाचे उत्पादन करण्यात केम हे गाव प्राचीन काळापासून अग्रेसर आहे. हे गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. वस्ती सुमारे दहा हजार लोकांची आहे.