किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड ही पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने १ एप्रिल १९९९ पासून सुरू करण्यात आलेली योजना आहे. यात किसान क्रेडिट कार्डधारकाला विविध बँकांतर्फे अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी पिकाचे दर जिल्हा पातळीवर नेमलेल्या तांत्रिक समितीमार्फत ठरविले जातात. २००७ साली रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांनाही किसान क्रेडिट कार्ड देण्याचा अध्यादेश काढला.[१]
संदर्भ
- ^ "किसान क्रेडिट कार्डपासून अजूनही 35 हजार शेतकरी वंचित !". 2012-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-27 रोजी पाहिले.