Jump to content

किशोर शांताबाई काळे

किशोर शांताबाई काळे

डॉ. किशोर शांताबाई काळे (इ.स. १९७० - २१ फेब्रुवारी, इ.स. २००७) हे एक मराठी डॉक्टर व लेखक होते. काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.[]

शिक्षण

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा किशोर काळे यांनी वैद्यकशास्त्रातील एम.बी.बी.एस. ही पदवी मिळवली. कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचा शेवट मी १९९४साली एम.बी.बी.एस. झालो या वाक्याने होतो.

साहित्य

भटक्या तमासगीर कोल्हाटी समाजात जन्माला आलेल्या, व बाप कोण हे माहिती नसल्याने आईचे नाव लावणाऱ्या डॉ. किशोर काळे ह्यांचे अत्यंत गाजलेले कोल्हाट्याचे पोर हे आत्मचरित्र ग्रंथालीने नोव्हेंबर १९९४मध्ये प्रकाशित केले. त्याचा इंग्लिश अनुवाद पेंग्विन पब्लिकेशन्सने प्रकाशित केला. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर डॉ. काळे यांना त्यांच्या समाजाने बहिष्कृत केले. त्यांच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी कोल्हाटी समाजाच्या काही नेत्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली.[] त्यांचे दुसरे पुस्तक मी डॉक्टर झालो हे "आपलं प्रकाशन" ने प्रकाशित केले आहे.

कोल्हाटी समाजातूनच पुढे आलेल्या प्रा. डॉ. सुषमा अंधारे त्यांच्या 'नातं मातीचं, नातं मातेचं!' या आत्मकथनपर लेखात ‘किशोर काळेंनी त्यांच्या साहित्यातून सामाजिक सुधारणा साधली जाण्यासाठी जो प्रहार केला त्यामुळे कोल्हाटी समाजाच्या सामाजिक सुधारणांसंबधाची पूर्ण भिंत कोसळली नाही तरीही सुषमा अंधारेंची स्वतःची लढाई सोपी झाली’ असा उल्लेख करतात. त्याच लेखात कोल्हाट्याचे पोर या पुस्तकाचे नाव कोल्हाटणीचे पोर असावयास हवे होते; त्यांच्या पुस्तकात कोल्हाटी समाजातील स्त्रीची व्यथा अधिक प्रकर्षाने मांडली जावयास हवी होती अशी स्त्रीवादी चिकित्साही त्या करतात.[]

संदर्भ

  1. ^ "किशोर शांताबाई काळे यांचे अपघाती निधन" (इंग्रजी भाषेत). १० मे २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "'कोल्हाटय़ाचं पोर'वर बंदीची पुन्हा मागणी". १० मे २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ अंधारे, सुषमा. "नातं मातीचं, नातं मातेचं! (सुषमा अंधारे)". २३ जून २०१५ रोजी पाहिले.
    अवतरणे:
    १) "कारण, त्याआधीच आमचा हा भाऊ काळाच्या पडद्याआड गेला. एक बरं झालं, त्यानं जो प्रहार केला, त्यामुळे पूर्ण भिंत कोसळली नाही; पण माझी लढाई नाही म्हटलं तरी सोपी झाली. किमान माझ्यापुढं कुणीतरी ती वाट चाललं होतं."
    २)... "आलाच योग तर किशोर काळे यांना खडसावून विचारावंसं वाटायचं "बाबा रे, "कोल्हाट्याच्या लेकराला बाप नसतो,' हे पुस्तकभर सांगतोयस, तर पुस्तकाचं नाव तरी किमान "कोल्हाटणीचं पोर' असं द्यायचं होतंस! आई-आजी-मावशी किंवा अजून कुणी ज्या ज्या तुझ्या आयुष्यात आणि पुस्तकाच्या आशयात आल्या, त्या तर सगळ्या स्त्रियाच; मग तरीही त्यांचा त्याग, संघर्ष, तडफड, दुष्टचक्र भेदून मोकळा श्‍वास घेण्याची जीवघेणी ओढ...यातलं काहीच नाही का जाणवलं तुला? पुरुष म्हणून तुझा अनुभव मांडलास रे; पण हे दुष्टचक्र किती भेदल गेलं, हा मूलभूत प्रश्‍न अनुत्तरितच. आणि तो मी विचारतेय, इतक्‍या वर्षांनी...! कारण, त्याच संघर्षाच्या मुशीतून मीही आलेय आणि जास्त होरपळलेय..."...
    Unknown parameter |आर्काइव्हदिनांक= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काइव्हदुवा= ignored (सहाय्य); More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)

साचा:DEFAULTOSRT:काळे, किशोर