Jump to content

किशोर विठ्ठलराव शिरसाट

किशोर विठ्ठलराव शिरसाट हे सध्या औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत . त्यांनी आजपर्यंत अनेक नाटकात भूमिका केल्या असून एक झुंज वाऱ्याशी , भाई तुम्ही कुठे आहात या नाटकातील भूमिकेसाठी राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची पारितोषिकेही मिळवली आहेत . या शिवाय त्यांनी वंडरफुल बावटा गुल, आधे अधुरे , तू वेडा कुंभार , देवाचिये द्वारी , आषाढ का एक दिन, चाहूल.अशी पाखरे येती , घोळात घोळ , दिल्या घरी तू जिवंत रहा , पांढर मरण , बापूंच्या देशात , शापित नंदनवन, जादुगार, जेहाद , धिंड इत्यादी नाटक एकांकिका मधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत . नाट्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना अभिनय, दिग्दर्शन , नेपथ्य , प्रकाश योजना, रंगभूषा वेशभूषा आणि संगीत संयोजनाचे धडे देत असतानाच विद्यार्थी लेखक घडवंण्या साठी विशेष प्रोत्साहन देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्याना लिहिते केले आहे . विद्यार्थी लेखकांच्या एकांकिकांचा महोत्सव ते सातत्याने आयोजित करीत असतात .

  • सादरीकरणाच्या कलेचे मूल्यभान : एक चिकित्सा
  • पथनाट्य स्वरूप : काल आणि आज
  • आत्मनिर्भर भारत और लोककलाओंके वाहक
  • मराठवाड्यातील नाट्यचळवळीत महिलांचे योगदान
  • पारंपारिक लोककलाओंमे दृष्टीगोचर नुक्कड नाटक हे संशोधन पत्र तर
  • मराठवाड्यातील नाट्यचळवळ
  • मराठवाड्यातील दलित नाट्य कलावंतांचे योगदान ही ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.