Jump to content

किशोर कदम

किशोर कदम
किशोर कदम
जन्मकिशोर कदम
९ नोव्हेंबर, १९६७ (1967-11-09) (वय: ५६)
इतर नावे सौमित्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रमकाय घडलं त्या रात्री?

किशोर भानुदास कदम ऊर्फ सौमित्र (नोव्हेंबर ९, इ.स. १९६७ - हयात) हे मराठी कवी व अभिनेते आहेत. गारवा हा त्यांचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय आहे. अभिनय आणि कविता अशा दोन्ही माध्यमांत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे, अनेक चित्रपटांमधून अभिनेते म्हणून त्यांनी काम केले आहे, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांतील कामांबद्दल उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांमध्ये शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्काराचा समावेश आहे.

जीवन

मुंबईच्या खार-कोळीवाडा भागात त्यांचे बालपण गेले. किशोर कदम यांनी बी.कॉम पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.

प्रकाशित साहित्य

शीर्षकसाहित्यप्रकारप्रकाशकप्रकाशन वर्ष (इ.स.)भाषा
...आणि तरीही मी!काव्यसंग्रहपॉप्युलर प्रकाशनमराठी
गारवाकाव्यसंग्रहमराठी
जावे कवितांच्या गावाकाव्यसंग्रह (सामूहिक)डिंपल प्रकाशनमराठी
बाउलकाव्यसंग्रहपॉप्युलर प्रकाशन२०१९मराठी

कवी सौमित्र यांना मिळालेले काव्य पुरस्कार

  • आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा केशवकुमार पुरस्कार (२०१९)
  • महाराष्ट्र राज्यपातळीवरचा २०वा 'राय हरिश्चंद्र साहनी' ऊर्फ ‘दुःखी’ काव्य पुरस्कार (२०१९)
  • शेवगाव नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा सदाशिव अमरापूरकर स्मृती पुरस्कार