किर्लोस्कर संगीत मंडळीची स्थापना ता. ३१ ऑक्टोबर १८८० या तारखेस झाली. स्वतः बळवंत पांडुरंग किर्लोस्कर, शंकरराव मुजुमदार, भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर हा पहिल्या अमदानीतला नटवर्ग - नंतर केशवराव भोसले, बालगंधर्व व दीनानाथ मंगेशकर. हे तिघेही नट-गायक ‘स्वदेश हितचिंतक’ व किर्लोस्कर संगीत मंडळीच्या अंकावर वाढले. हे तीन चिरस्मरणीय झालेले कलावंत म्हणजे महाराष्ट्राच्या नाट्य-नटेश्वराचे त्रि-नेत्रच होत.
या कलावंतांनी किर्लोस्कर संगीत मंडळीली या संस्थेतर्फे अनेक चांगली नाटके रंगभूमीवर आणली. नाट्यक्षेत्रात किर्लोस्करांनी नवेनवे प्रयोग केले. पूर्वी विष्णूदासी परंपरेने नाटकातील प्रयोग होत असत. पण ही पद्धत बदलून त्यांनी सूत्रधार, परिपार्श्वक आणि नटी ही संस्कृत नाटकाची परंपरा मराठी रंगभूमीवर आणली. तसेच नाटकातल्या दर्जेदार संगीतामुळे उच्चवर्गाचा ओढा नाटकाकडे वाढला. त्यावेळी नाटक व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना समाजात चांगले स्थान नसे पण दर्जेदार नाटके देऊन समाजाचा हा समज बदलावा यासाठी किर्लोस्करांनी प्रयत्न केले.
मराठी संगीत रंगभूमी |
---|
नाट्यसंस्था | - आर्योद्धारक नाटक मंडळी
- इचलकरंजी नाटकमंडळी
- किर्लोस्कर संगीत मंडळी
- कोल्हापूरकर नाटकमंडळी
- गंधर्व संगीत मंडळी
- तासगावकर नाटकमंडळी
- नाट्यमन्वंतर
- पुणेकर नाटकमंडळी
- बलवंत संगीत मंडळी
- रंगशारदा
- ललितकलादर्श
- सांगलीकर नाटकमंडळी
|
---|
नाटककार आणि पद्यरचनाकार | |
---|
नाटके | संगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी? · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे |
---|
संगीतकार | |
---|
संगीतनट | |
---|