Jump to content

किरण करमरकर

किरण करमरकर
किरण करमरकर
जन्मकिरण करमरकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
प्रमुख चित्रपटनिष्पाप
पत्नी रिंकू धवन

किरण करमरकर (जन्मदिनांक अज्ञात - हयात) हे भारतीय दूरचित्रवाणी, चित्रपट व नाटकांत काम करणारे अभिनेते आहे. स्टार प्लस वरील हिंदी धारावाहिक कहानी घर घर की मधील ओम अगरवाल ह्या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध आहेत.

कारकीर्द

करमरकरांची कारकीर्द मराठी रंगभूमी व व्यावसायिक जाहिरातींमधून झाली. एकता कपूर यांनी दिग्दर्शित केलेल्या घर एक मंदिर या हिंदी दूरचित्रवाणी मालिकेमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००० मध्ये सुरू झालेल्या कहानी घर घर की या मालिकेत अभिनेत्री साक्षी तन्वरच्या पार्वती ह्या व्यक्तिरेखेचा पती असलेल्या ओम आगरवालच्या भूमिकेमध्ये किरण करमरकरांना प्रेक्षकांचा भरपूर आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कलर्स टीव्ही वरील उतरन ह्या मालिकेत त्यांनी तेजसिंग बुंदेलाची खलनायकी भूमिका केली आहे.

करमरकरांनी काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये सुद्धा छोट्या भूमिका केल्या. त्याच बरोबर हिंदी व मराठी नाटकांत पण काम केले. २००६ मध्ये भावना बलसावर ह्यांच्या समवेत मेरा नाम जोकर ह्या विनोदी नाटकात ते प्रमुख भूमिकेत दिसले. नाटकाचे दिग्दर्शन बलसावर ह्यांच्या आई व प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे ह्यांचे होते. २०१० मध्ये चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित बस इतनासा ख्वाब है नाटकात शेफाली शाह सोबत ते दिसले.

त्यांच्या क्षणोक्षणी ह्या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

खाजगी जीवन

आपल्या खाजगी जीवनात करमरकर हे अभिनेत्री रिंकू धवन ह्यांच्याशी विवाहबद्ध आहेत. रिंकू धवन ह्यांनी कहानी घर घर की मालिकेत करमरकरांच्या बहिणीची भूमिका बजावली होती.

चित्रपट कारकीर्द

इ . स.शीर्षकभूमिकामाध्यमटिपणी
घर एक मंदिरदूरचित्रवाणी मालिका
पडोसनदूरचित्रवाणी मालिका
इतिहासदूरचित्रवाणी मालिकादूरदर्शनवर प्रदर्शित
२०००कहानी घर घर कीओम अगरवालदूरचित्रवाणी मालिकास्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित
२००४थोडा तुम बदलो थोडा हमचित्रपट
२००४केहना ही मुझकोनिश्चय कपूरदूरचित्रवाणी मालिका
२००६सारथीभुजंग आहुजादूरचित्रवाणी मालिकास्टार प्लस या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रदर्शित
पाहुणे कलाकार
२००६थोडीसी जमीन थोडासा आसमानसुधांशूदूरचित्रवाणी मालिकास्टार प्लसवर प्रदर्शित
२००६कच्चे धागेनाटक
२००६मेरा नाम जोकरनाटक
२००७कॉमेडी सरकसस्पर्धकदूरचित्रवाणी मालिकासोनी टीव्हीवर प्रदर्शित
२००७जस्ट मॅरेजचित्रपट
२००८कहानी हमारे महाभारत कीशंतनूदूरचित्रवाणी मालिका9X वाहिनीवर प्रदर्शित
२००९क्षणोक्षणीमुख्यमंत्रीचित्रपटमराठी भाषा
२०१०राजनीतीएसपी शर्माचित्रपट
२०१०आघातडॉक्टर देशपांडेचित्रपटमराठी भाषा
२०१०पंख चित्रपट
२०१०बस इत्नासा ख्वाब हैनाटक
सलीम आरिफनाटक
हमसफरनाटक
शादी की होम डिलीवरीनाटक
२०११जिंदगी कहे - स्माईल प्लीजदूरचित्रवाणी मालिकालाईफ ओके वर प्रदर्शित
२०१२चक्रव्यूगृहमंत्रीचित्रपट
२०१२शांघाईचित्रपट
२०१२आरोही गोष्ट तीघांचीचित्रपटमराठी भाषा
२०१२उतरनतेजसिंग बुंदेलादूरचित्रवाणी मालिकाकलर्स टीव्हीवर प्रदर्शित
२०१३पुणे ५२चित्रपटमराठी भाषा