Jump to content

किम जाँग-इल

किम जॉंग-इल

उत्तर कोरियाचा सर्वोच्च पुढारी
कार्यकाळ
८ जुलै १९९४ – १७ डिसेंबर २०११
मागील किम इल-सुंग
पुढील किम जॉंग-उन

जन्म १६ फेब्रुवारी १९४१ (1941-02-16)
व्यात्स्कोय, खबारोव्स्क क्राय, सोव्हिएत संघ (सोव्हिएत नोंदीनुसार)
१६ फेब्रुवारी १९४२ (1942-02-16)
बैकदू पर्वत, जपानी कोरिया (उत्तर कोरियन नोंदीनुसार)
राजकीय पक्ष कोरियन कामगार पक्ष
धर्म नास्तिक
सही किम जाँग-इलयांची सही

किम जॉंग-इल (कोरियन: 김정일; १६ फेब्रुवारी १९४१/४२ - १७ डिसेंबर २०११) हा उत्तर कोरिया देशाचा सर्वोच्च नेता, कामगार पक्षाचा सरचिटणीस, राष्ट्रीय संरक्षण खात्याचा प्रमुख व उत्तर कोरियन लष्कराचा प्रमुख होता. १९९४ साली वडील किम इल-सुंग ह्यांच्या मृत्यूनंतर किम जॉंग-इलच्या हाती उत्तर कोरियाची सत्ता आली.

१७ डिसेंबर २०११ रोजीकिम जॉंग-इलचे हृदयाघात होउन निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगा किम जॉंग-उन ह्याला त्याने वारस नेमले आहे.

स्वतःला देवाचा अवतार समजणाऱ्या किम जॉंग-इलच्या विक्षिप्त स्वभाव व अविवेकी धोरणांमुळे उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली. त्याच्या अणवस्त्रे मिळवण्याच्या धडपडीमुळे व इतर गोपनीयता राखण्याच्या निर्णयांमुळे चीन व काही अंशी रशिया वगळता सर्व जगाने उत्तर कोरियावर बहिष्कार टाकला होता. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा लष्करावर खर्च करण्याच्या त्याच्या धोरणामुळे उत्तर कोरियामधील बहुतेक सर्व उद्योग बंद पडले.


संदर्भ

बाह्य दुवे