किनवट विधानसभा मतदारसंघ
किनवट विधानसभा मतदारसंघ - ८३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, किनवट मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो. किनवट हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे भीमराव रामजी केराम हे किनवट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | भीमराव रामजी केराम | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | प्रदीप नाईक जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | प्रदीप नाईक जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
किनवट | ||
उमेदवार | पक्ष | मत |
प्रदीप हेमसिंग जाधव | राष्ट्रवादी | ६९६४५ |
भीमराव रामजी केराम | भाजप | ५१४८३ |
अर्जुन किशनराव अडे | भारतीय साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी) | १२६०० |
धर्मसिंग दगडू राठोड | जनसुराज्य पक्ष | ३७०२ |
सुरेश रामराव रांगणेवार | [बसप]] | २९०२ |
अशोक मुकुंदराव नेम्माणीवार | मनसे | २१४५ |
श्रीनिवास रामवल्लभजी जोशी | अपक्ष | १४७० |
आकाश सुभाष जाधव | भारिपा बहुजन महासंघ | १०५३ |
खान असदखान महमद | अपक्ष | ७९७ |
नागोराव मारोती वाघमारे | अपक्ष | ६५८ |
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किनवट विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २० जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".