Jump to content

कितीदा नव्याने तुला आठवावे

कितीदा नव्याने तुला आठवावे हे ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातील एक गीत आहे. आर्या आंबेकर आणि मंदार आपटे यांनी हे गीत गायले आहे. देवयानी कर्वे कोठारी यांनी लिहिलेल्या या गाण्याला मंदार आपटे यांनी संगीत दिले आहे. झी म्युझिक कंपनीकडून २०१७ साली हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.

प्रदर्शित झाल्याबरोबर प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून या गाण्याला खूप प्रशंसा मिळाली. तरुण वर्गामध्ये हे गाणे विशेष लोकप्रिय असून समाजमाध्यमांवर या गाण्याची नेहमी चर्चा असते.

"कितीदा नव्याने तुला आठवावे"
गीत by आर्या आंबेकर आणि मंदार आपटे
from the album ती सध्या काय करते
भाषामराठी
Released २०१७
रेकॉर्ड केले २०१७
रेकॉर्डिंग कंपनी झी म्युझिक मराठी
Composer(s) मंदार आपटे
Lyricist(s) देवयानी कर्वे-कोठारी

निर्मिती

झी म्युझिक स्टुडिओद्वारे गाण्याची निर्मिती झाली. २०१७ साली गाणे प्रसिद्ध केले गेले. देवयानी कर्वे-कोठारी यांनी हे गीत लिहिले. तर मंदार आपटेंनी संगीत दिले. आर्या आंबेकर, ज्या स्वतः चित्रपटाच्या नायिकाही आहेत, यांनी मंदार आपटेंसोबत हे गीत गायले आहे.[][]

व्हिडीओ

चित्रपटात हे गीत ठराविक प्रसंगी वाजत राहते. काही भावनिक प्रसंगी हे गीत परिणामकारकता वाढवते.

चित्रपटात एका प्रसंगी अनुरागच्या (नायकाच्या) अनुपस्थितीत नायिका तन्वी बऱ्याच वर्षांनी अनुरागच्या घरी जाते. अनुरागची पत्नी राधिका तिच्या मुलीला नाव सांगायला सांगते. तेव्हा ती म्हणते, "तन्वी अनुराग देशपांडे." तन्वी स्वतःचे नाव ऐकून निरुत्तर होते. राधिका पुढे खुलासा करते, "अनुरागचं आधीच ठरलं होतं. मुलगी झाली तर आपण तिचं नाव तन्वी ठेवायचं. मला म्हणाला होता, माझ्या लहानपणीची जीवलग मैत्रीण आहे."

हा भावनिक प्रसंग खूप गाजला. चित्रपटातल्या सर्वात लोकप्रिय प्रसंगांमध्ये हा भाग येतो. या प्रसंगात पहिल्यांदाच नायिकेवर "कितीदा नव्याने" हे गाणे चित्रित केले आहे. आर्या आंबेकरच्या आवाजात हे गाणे चित्रपटाच्या शेवटच्या भागात परिणाम साधते.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Kitida Navyane Lyrics | कितीदा नव्याने लिरिक्स | Ti Saddhya Kay Karte | Mandar Aapte". Lyrics Marathi. 2021-12-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-30 रोजी पाहिले.
  2. ^ "Ti Saddhya Kay Karte (2017) - Movie | Reviews, Cast & Release Date in jamnagar - BookMyShow". in.bookmyshow.com. 2021-12-30 रोजी पाहिले.