Jump to content

किंग फहाद आंतरराष्ट्रीय विमानतळ

किंग फह्द आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: DMMआप्रविको: OEDF) सौदी अरेबियाच्या दम्मम शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहरापासून २० किमी वायव्येस असलेला हा विमानतळ जगातील सगळ्यात मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.

याची पायाभूत रचना १९९० च्या सुमारास झाली. त्यावेळी याचा वापर मुख्यत्वे लढाऊ विमाने ठेवण्यासाठी करण्यात येई. पहिल्या आखाती युद्धादरम्यान अमेरिकेची ए-१० बॉम्बफेकी विमाने तसेच एएच-६४, सीएच-४७, यूएच-६० आणि ओएच-५८ प्रकारची हेलकॉप्टरे साठविण्यात आली. १९९मध्ये या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्यावेळी दहरान विमातळावरील सगळी वाहतूक येथे आणण्यात आली. या विमानतळाला सौदी अरेबियाचा राजा फह्द बिन अब्दुलअझीझ अल सौदचे नाव देण्यात आले आहे.