Jump to content

काहेर किनमोनवी किल्ला



काहेर किनमोनवी किल्ला
local_name
आयरिश: Caisleán Chathair Chinn Mhaonmhaí[]
आयर्लंडच्या राज्यघटनेची चौतीसावी दुरुस्ती मध्ये होय मताचा प्रचार करण्यासाठी जो कॅस्लिनच्या पेंटिंगने वाडा झाकलेला आहे..[]
स्थान काहेर किनमोनवी , क्रॉफवेल,
काउंटी गॅलवे, आयर्लंड
निर्मिती १५वे शतक
स्वामित्व पीटर हेस
प्रवेशद्वार

काहेर किनमोनवी किल्ला, ज्याला काहेर किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा आयर्लंडमधील काउंटी गॅलवे येथे स्थित एक टॉवर हाउस आहे .

स्थान

काहेर किनमोनवी किल्ला हा डंकेलीन नदीच्या उत्तर किनाऱ्यावर अथेनरीच्या आग्नेय दिशेला ७.५ किमी (४.७ मैल) अंतरावर स्थित आहे.

इतिहास

हे टॉवर हाऊस १५ व्या शतकात काही काळ बांधले गेले. १५७४ मध्ये ते मायलर हेन्री बर्क यांच्याकडे होते.[]

स्कूलस् कलेक्शननुसार, १५० किलो वजनाचा दगड नाईट ऑफ द बिग विंड (१८४०) रोजी वाड्याच्या वरच्या बाजूवरोन उडाला ९१ मीटर अंतरावर असलेल्या लोखंडी गेटवर पडला. त्यामुळे ते गेट ठेचून निघाले.[]

१९९६ पर्यंत दोन शतके तो अवशेष अवस्थेत होता. नंतर स्टोनमेसन आणि कारागीर पीटर हेस यांनी ते विकत घेतले आणि त्याचे नूतनीकरण केले. तो अजूनही त्याच्या जोडीदारासह आणि मुलांसह तेथे राहतो.[][] हे आता एर बीएनबी मध्ये भाड्याने उपलब्ध आहे. वेबसाइटवर सर्वात लोकप्रिय खोली म्हणून वर्णन केलेल्या किल्ल्यातील मास्टर बेडरूमसह.[][][]

वर्णन

टॉवर हाऊस चांगल्या प्रकारे संरक्षित आहे. ते पाच मजली उंच आहे. प्रत्येक कोपऱ्यावर बार्टिझन्स आणि आग्नेय दिशेला एक आवर्त जिना आहे. यात मॅचीकोलेशन आणि आयरिश क्रेनलेशन आहेत.[१०] नवीन छप्पर स्थानिक ओक, स्लेट आणि खिळे नसलेले होते. [११]

संदर्भ

  1. ^ "Cathair Chinn Mhaonmhaí/Caherkinmonwee". logainm.ie.
  2. ^ Healy, Gráinne; Sheehan, Brian; Whelan, Noel (2 November 2015). "Ireland Says Yes: The Inside Story of How the Vote for Marriage Equality Was Won". Merrion Press – Google Books द्वारे.
  3. ^ "Caher Castle". Visit Galway.
  4. ^ "Ganntaigh (Ganty) | The Schools' Collection". dúchas.ie.
  5. ^ "This Irish castle is the most visited private room in Airbnb's history". independent.
  6. ^ "Ever wanted to live in a castle? This Galway one is yours for €380k..." Daily Edge. 14 March 2012.
  7. ^ https://www.housebeautiful.com/lifestyle/a27484416/cahercastle-castle-ireland-airbnb/
  8. ^ "Irish castle dating from 1450 and restored to its former glory is now for sale". IrishCentral.com. 14 November 2019.
  9. ^ "The Galway castle that's the most-visited Airbnb in Europe". The Irish Times.
  10. ^ Spray, Aaron (15 August 2022). "Ireland's Cahercastle Has Airbnb's Most Popular Room". The Travel.
  11. ^ "Castle for Sale in Ireland: Caherkinmonwee Castle". 16 April 2010.