काश्मीर
काश्मीर हा अफगानिस्तान,तिबेट(चीनने अनधिकृत कब्जा केलेला) व भारतीय उपखंड (पाकिस्तान,भारत,भुटान, बांग्लादेश,नेपाळ, म्यांमार, श्रीलंका, मालदीव यांआ भारतीय उपखंडात धरतात) यांच्या मध्यभागी असलेला भारताच्या जम्मू आणि काश्मीर या राज्याचा प्रमुख भाग आहे.
काश्मीर खोऱ्याचा जवळजवळ २/३ भाग भारताच्या ताब्यात तर १/३ भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतातील भागाला जम्मू काश्मीर म्हणतात. पाकिस्तानच्या ताब्यातील भागाला पाकिस्तानात 'आझाद काश्मीर' तर भारतात 'पाकव्याप्त काश्मीर' म्हणतात. "पृथ्वीवरील स्वर्ग" असे काश्मीरचे वर्णन करतात. केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे.
२०१९ पूर्वी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पूर्णपणे भारतात समाविष्ट केले. जम्मू काश्मीरचे विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लद्दाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले.
चित्रदालन
काश्मीरवरील मराठी पुस्तके
- काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)