Jump to content

काश्मीर खोरे

उपग्रहामधून टिपले गेलेले काश्मीर खोऱ्याचे चित्र. खोऱ्याच्या डावीकडे पीर पंजाल रांग तर उजवीकडे हिमालय पर्वत आढळतो.
काश्मीर खोऱ्यात वसलेले श्रीनगर

काश्मीर खोरे हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या काश्मीर भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगेने वेढला गेलेला हा प्रदेश सुमारे १३५ किमी लांब तर ३२ किमी रूंद आहे. काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस पीर पंजाल पर्वतरांग तर उत्तर व पूर्वेस हिमालय पर्वतरांग आहे. झेलम ही येथील प्रमुख नदी आहे. श्रीनगर हे काश्मीरमधील प्रमुख शहर तसेच अनंतनाग, बारामुल्ला, कुपवाडा इत्यादी प्रमुख नगरे खोऱ्यातच स्थित आहेत.

सुमारे ६९ लाख लोकसंख्या असलेल्या काश्मीर खोऱ्यातील जनता प्रामुख्याने मुस्लिम धर्मीय असून उर्दूकाश्मिरी ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाने काश्मीरला ग्रासले असून येथे अनेक अतिरेकी व फुटीरवादी संघटना कार्यरत आहेत.

श्रीनगर विमानतळ तसेच राष्ट्रीय महामार्ग १ ए हे काश्मीर खोऱ्याला जम्मू व उर्वरित भारतासोबत जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर जम्मूहून श्रीनगरपर्यंत थेट रेल्वेसेवा शक्य होईल. ह्या मार्गावरील पीर पंजाल रेल्वे बोगदा हा आजच्या घडीला भारतामधील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे.

गुणक: 34°N 74°E / 34°N 74°E / 34; 74