Jump to content

काशीबाई कानिटकर

काशीबाई कानिटकर
जन्म इ.स. १८६१
अष्टे, महाराष्ट्र
मृत्यू इ.स. १९४८
राष्ट्रीयत्वमराठी भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकथा, कादंबरी
विषयस्त्रीवाद
पती गोविंद वासुदेव कानिटकर

काशीबाई कानिटकर (इ.स. १८६१ - इ.स. १९४८) या मराठी भाषेतील लेखिका व स्त्रीवादी समाजसुधारक होत्या. मराठी समाजात व स्थूलमानाने भारतीय समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविषयी त्यांनी आपल्या साहित्याद्वारे आवाज उठवला.

जीवन

काशीबाईंचा जन्म वर्तमान महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातील अष्टे गावी झाला. न्यायालयीन पेशात असलेल्या व स्वतः व्यासंगी लेखक असलेल्या गोविंद वासुदेव कानिटकरांसोबत वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह झाला[]. गोविंदरावांनी काशीबाईंना घरीच मराठी, संस्कृत, इंग्रजी भाषा शिकवल्या[].

काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषाविषय शिकवीत असत[]. पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिले.

काशीबाई इ.स. १९१० च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर होत्या[].

कादंबरी

  • रंगराव
  • पालखीचा गोंडा

कथा संग्रह

  • शेवट तर गोड झाला
  • चांदण्यातील गप्पा

संदर्भ

  1. ^ अनगोळ,पद्मा. द इमर्जन्स ऑफ फेमिनिझम इन इंडिया, १८५० - १९२० (स्त्रीवादाचा भारतातील उदय, इ.स. १८५० - इ.स .१९२०) (इंग्लिश भाषेत). p. २३१.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c एन्सायक्लोपीडिक डिक्शनरी ऑफ मराठी लिटरेचर - व्हॉल्यूम १ (मराठी साहित्याचा कोशसंग्रह - खंड १) (इंग्लिश भाषेत). p. २९८.CS1 maint: unrecognized language (link)