Jump to content

काव्याग्रह

काव्याग्रहच्या चौथ्या अंकाचे मुखपृष्ठ

काव्याग्रह हे मराठी भाषेतून प्रकाशित होणारे नियतकालिक असून याचा पहिला अंक एप्रिल, इ.स. २०१० मध्ये प्रकाशित झाला होता.

कवितेसाठीच ‘काव्याग्रह’

'काव्याग्रह' हे नियतकालिक वाशीम येथून प्रकाशित केले जाते. विष्णू नारायण जोशी हे त्याचे मुख्य संपादक आहेत. रेखाचित्रकार रा. मु. पगार सहसंपादक आहेत. गजानन वाघ, विकास विनायकराव देशमुख आणि शेषराव पिराजी धांडे यांचा संस्थापक संपादकीय मंडळामध्ये समावेश आहे. विनायक येवले यांच्याकडे सहायक संपादक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांचा संपादक मंडळात नव्याने समावेश करण्यात आला आहे. काव्याग्रहच्या आठव्या वृक्षाचे अतिथी संपादन संदिप शिवाजीराव जगदाळे यांनी केले आहे.

काव्याग्रहच्या भाषेत हे सगळे ‘शाईचं गणगोत' आहेत.

’काव्याग्रह’ने प्रकाशन विश्वात सुद्धा पाऊल ठेवले असून,ना नफाना तोटा या तत्त्वावर ’काव्याग्रह’ दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन करते. ’काव्याग्रह’ केवळ नियतकालिक नाही तर सकस साहित्याची एक चळवळ आहे. काव्याग्रह्ची सुरुवात एप्रिल २०१० मध्ये झाली. काव्याग्रह हे कवितेला वाहिलेले नियतकालिक आहे. आतापर्यंत काव्याग्रहचे नऊ अंक प्रकाशित झाले आहेत. २०१० मध्येच काव्याग्रहला गोपाल गणेश आगरकर उत्कृष्ट अनियतकालिक हा पुरस्कार मिळाला. मराठी काव्याग्रह सोबतच आता काव्याग्रह हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्येही प्रकाशित होणार आहे. मे २०१७ या महिन्यामध्ये काव्याग्रह हिंदी आणि इंग्रजीचे अंक भारतभर उपलब्ध असतील. मराठी नियतकालिकामध्ये हा पहिलाच प्रयोग आहे.काव्याग्रह काही विशेषांक घेऊन येत आहे. यात आसाराम लोमटे विशेषांक आणि सतीश काळसेकर विशेषांकांचा समावेश आहे. काव्याग्रह प्रकाशनाने आतापर्यंत एकूण अकरा पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्यात दहा कवितासंग्रह आणि एका आत्मचरित्राचा समावेश आहे.

पुरस्कार

  • उत्कृष्ट नियतकालिकासाठीचा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार. (देवयाणी प्रकाशन, नागपूर), २०१०.

काव्याग्रहने प्रकाशित केलेल्या साहित्यकृती

  • अस्तित्वाच्या पाऊल खुणा (काव्यसंग्रह) : रा. मु. पगार.
  • इथे पेटली माणूस गात्रे (काव्यसंग्रह) : बाबाराव मुसळे
  • अनावृत्त रेषा (काव्यसंग्रह) : प्रियंका डहाळे.
  • झोपडी नंबर बारा (काव्यसंग्रह) : अनिल कांबळे.
  • ठसे बदललेल्या मुक्कामावरून(काव्यसंग्रह) : विनायक येवले
  • माणूस नावाच्या बागुलबुवाची गोष्ट (काव्यसंग्रह) : प्रेमानंद शिंदे
  • पिंडपात(काव्यसंग्रह): सुखदेव ढाणके
  • शिरस्नाता(काव्यसंग्रह) : सारिका उबाळे
  • काळोख गडद होत चाललाय(काव्यसंग्रह):गिरीश सपाटे
  • चित्कळा(आत्मचरित्र): हरिभाऊ क्षीरसागर

काव्याग्रहने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य शासनाचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार, विशाखा पुरस्कार, संत नामदेव पुरस्कार, अनंत फंदी पुरस्कार, मेघदूत पुरस्कार, विठाई पुरस्कार, सूर्यांश पुरस्कार इत्यादी.

चित्रदालन

बाह्य दुवे