Jump to content

काळोखातील अग्निशिखा (कादंबरी)

काळोखातील अग्निशिखा ही कादंबरीकार नरेंद्र नाईक यांनी लिहिलेली एक ऐतिहासिक कादंबरी आहे. हैदराबाद मुक्तीसंग्राम काळातील रजाकारांविरुद्धच्या कल्हाळी गावातील एका संघर्ष घटनेचे या कादंबरीत सत्य घटना आहे. []

समीक्षकांची मते

  • जेष्ठ्समीक्षक,मराठीचे अभ्यासक प्रा.द.ता.भोसले पंढरपूर यांच्या मते,
 कल्हालीतिल स्वातंत्र्यसंग्राम रजाकारांनी ३५००सैनीकासह गढीला घातलेला वेढा आन केलेला हिंसाचार शिवाय रजाकाराविरुद्ध

जीवावर उदार होऊन लढणारे आप्पासाहेब नाईक व अन्य सैनिकांनी प्राणपणाने लढलेला लढा नरेंद्र नाईकांनी आपल्या 'काळोखातील अग्निशिखा' कादंबरीतून जिवंत केला आहे.खरेतर ऐतिहासिक कादंबरी लेखनखूप आवघड आसते. सत्यनिष्ठा,प्रसंगाची निवड,तटस्थवृत्ती,निर्मितीसाठीचे तादात्मे,वातावरणाची सुक्षमता,सजीवपात्र चित्रण,खास ऐतिहासिक भाषा, प्रवाही संवाद आणि शब्दात न मावणारा संग्राम.शब्दात पकडणे आतिशय कठीण आसते.

परंतु यासर्व कसोट्या काळोखातील अग्निशिखाला उत्तम प्रकारे लागू पडतात.त्यामुळे ही पहिलीच कादंबरी असली तरी 

गुणाने ती पहिल्या नंबरची आहे.काळोखातील अग्निशिखातील आप्पासाहेब नाईकांचे व्यक्तिचित्रण,देशभक्ती,संगठन कौशल्य, सत्यनिष्ठा आणि गरीब विषयीचा कळवला या गुणामुळे उजळून निघाले आहे.

  • प्रा.रा.र.बोराडे यांच्या मते,
काळोखातील अग्निशिखा वाचली.कल्लोळीच्या आप्पासाहेब नाईक यांनी निजामाशी दिलेला हा लढा अभूतपूर्व म्हणावयास हवा.
  • कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या मते,
 काळोखातील अग्निशिखा ही कादंबरी इतिहासाला साक्ष ठेवुन केलेली एकूणच कथानकाची मांडामांड इ.मुळे कादंबरी वाचनीय,

संस्मरणीय झाली आहे.ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून मान्यता मिळण्यास अडचण नाही ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या मते,

 हैदराबाद मुक्ती संग्रामात दालीतांचाही वाटा आहे.नरेंद्र नाईक यांच्या काळोखातील अग्निशिखा या कादंबरीने विशेश्वाताने 

तो पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.लढता लढता अनेकांना बलिदान करावे लागते. ही घटना कोणत्याही वाचकाला चटका लावणारी आहे.

  • भ.मा.परसवाळे जेष्ठ्समीक्षक यांच्या मते,

काळोखातील अग्निशिखा कादंबरी मुळे काल्हालीचा लढा अधोरेखित झाला.

  • कविवर्य देविदास फुलारी यांच्या मते,
 काळोखातील अग्निशिखा ही कादंबरी ह्या संघर्षाचा लेखा जोखा होय...
  • जेष्ठ् विचारवंत शेषराव मोरे यांच्या मते,
 काळोखातील अग्निशिखा ही धर्मनिरपेक्ष कादंबरी....
  • नरसिंग देशमुख यांच्या मते,
कल्लाळी गावचा इतिहास फारच ज्वलंत आणि महत्त्वपूर्ण आहे.ब-याच लोकांना तो अजूनही माहीत नाही.

एवढ्या मोठ्य् संख्येने यात लोक सहभागी झाले होते हे जगा समोर आले पाहिजे.तुम्ही हा प्रयत्न केला त्या बद्दल तुमचे अभिनंदन..!

संदर्भ