काळे गिधाड
काळे गिधाड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
एजिपियस मोनॅकस लिनेयस, १७५८ | ||||||||||||
काळे गिधाड एक मोठा शिकारी पक्षी आहे जो युरेशियातल्या बऱ्याचश्या भागात आढळतो. गडचिरोली (महाराष्ट्र) मध्ये पण हा पक्षी आढळतो, हा जगातील दोन सर्वात मोठ्या गिधाडांच्या प्रजातींपैकी एक आहे. याची महत्तम लांबी १.२ मी, पंखांची लांबी ३.१ मी आणि वजन १४ किलोग्रॅम असते. काळे गिधाड बरेच मोठे आणि रुबाबदार असल्यामुळे त्याला ‘गृध्रराज’ म्हणतात.[२]
ओळखण
हा जगातील सर्वात मोठा शिकारी पक्षी आहे. फक्त हिमालयीन गिधाडाचा आकार या काळ्या गिधाडाएवढा होऊ शकतो. तरीही सर्वात मोठे काळे गिधाड सर्वात मोठ्या हिमालयीन गिधाडापेक्षा मोठे असते. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते.[३] या भव्य पक्ष्याची लांबी ९८-१२० सेंमी आणि पंखाची लांबी २.५ ते ३.१ मी असते. नरांचे वजन ६.३-११.५ किग्रॅ तर माद्यांचे वजन ७.५-१४ किग्रॅ असते. हा जगातील सर्वात वजनदार उडणारा पक्षी आहे.[३]
याचे शरीर स्पष्टपणे गडद असते. प्रौढांमध्ये फिकट डोके वगळता संपूर्ण शरीर गडद तपकिरी ते काळे असते. डोके आणि गळ्यावरील त्वचेचा रंग निळा-करडा असतो आणि डोळ्यांच्या वर पांढरा रंग असतो. डोळे तपकिरी असतात; चोच मोठी, मजबूत, टोकाशी वाकडी आणि निळ्या-करड्या रंगाची; पाय निळ्या-करड्या रंगाचे असतात. उडण्याच्या कामी येणारे पंख काळे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी एकटे आढळतात.[३]
वितरण आणि अधिवास
काळे गिधाड युरेशियन प्रजात आहे. पश्चिमेकडे ते स्पेन, पोर्तुगाल, दक्षिण फ्रान्समध्ये आढळतात. ग्रीस, तुर्की आणि मध्य पूर्व मध्येही ते आढळतात. त्यापुढे अफगानिस्तान आणि पूर्वेला उत्तर भारत आणि मध्य आशियामध्ये आढळतात. मध्य आशियातील मंगोलिया, कोरिया, मंचुरिया इथे त्यांची वीण होते.
हे पक्षी डोंगराळ, पर्वतमय भागात राहतात. विशेषतः उंचावरील कुरणांसारख्या शुष्क अर्ध-खुल्या प्रदेशात ते राहतात. युरोपमध्ये ते १०० ते २००० मी उंचापर्यंत आढळतात. आशियात आणखी जास्त उंचावर आढळून येतात. या प्रजातीची गिधाडे अतिशय उंचावर उडू शकतात. एक काळे गिधाड माऊंट एव्हरेस्टवर ६९७० मी उंचावर दिसले होते.[३]
प्रजनन
उत्तर-पश्चिम भारतात फेब्रुवारी किंवा एप्रिल आणि उत्तर-पूर्व भारतात जानेवारीमध्ये ते घरट्याकडे परत जातात. सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत त्यांचा विणीचा हंगाम असतो. घरटे बरेच मोठे व काटक्यांचे केलेले असून उंच झाडावर जमिनीपासून ९—१२ मी. उंचीवर असते. कधी कधी उंच कड्यावरील खडकांच्या कंगोऱ्यात घरटे करतात. मादी दर खेपेस पांढऱ्या रंगाचे एकच अंडे घालते.
इतर सर्व गिधाडांप्रमाणे काळे गिधाडदेखील मेलेल्या प्राण्यांच्या मांसावर उपजीविका करतात.
संरक्षण स्थिती
गेल्या २०० वर्षात काळ्या गिधाडांची संख्या सर्व ठिकाणी कमी होत आहे. २१व्या शतकाच्या सुरुवातीला यांची संख्या ४५००-५००० असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
चित्रदालन
- स्पेनमधील काळे गिधाड
संदर्भ
- ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल. "एजिपियस मोनॅकस". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती 2016.3. २१-०४-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link) - ^ कर्वे, ज. नी. "गिधाड". मराठी विश्वकोश. खंड ५. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.
- ^ a b c d लेस्ली ब्राऊन आणि डीन अमॅडन. ईगल्स, हॉक्स ॲंड फाल्कन्स ऑफ द वर्ल्ड (इंग्रजी भाषेत).