काळा प्लेग
1346–1353 pandemic in Eurasia and North Africa Mina. 13076-13077 f. 24v. | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | disease outbreak, जागतिक साथ | ||
---|---|---|---|
स्थान | आशिया, युरोप, उत्तर आफ्रिका, कॉकेशस, जॉर्जिया, अझरबैजान, रशिया, आर्मेनिया | ||
मूळ देश |
| ||
भाग |
| ||
आरंभ वेळ | इ.स. १३४६ | ||
शेवट | इ.स. १३५२ | ||
मृत्युंची संख्या |
| ||
| |||
काळा प्लेग, ब्लॅक डेथ किंवा काळा मृत्यू ही १३४६-५३ दरम्यान युरोपमध्ये पहिल्यांदा अवतरलेली महामारी होती. बुबोनिक प्लेगचा एक प्रकार असलेली ही महामारी मानवी इतिहासातील ही सर्वात घातक महामारी होती. यात अंदाजे ५ कोटी लोक मरण पावले, १४व्या शतकातील युरोपच्या लोकसंख्येपैकी ५०% यात बळी पडल्याचा अंदाज आहे. [१] युरोपीय इतिहासातील सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक असलेल्या साथीचा खोल आणि दूरगामी प्रभाव तेथील लोकसंख्या, संस्कृती आणि अर्थकारणावर पडला. या साथीने सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक उलथापालथी घडवून आणल्या
हा रोग येर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे होतो आणि पिसू व हवेतून पसरतो. [२] [३] काळ्या ब्लॅक डेथचे मूळ विवादित आहे. आनुवंशिक विश्लेषणातून असे संकेत आहेत की येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिया सुमारे २,६०० वर्षांपूर्वी सध्याच्या किर्गिस्तान आणि चीनच्या सीमेवर असलेल्या तियान शान पर्वतांमध्ये विकसित झाले. मध्य आशिया, चीन, मध्य पूर्व आणि युरोपकडे निर्देश करणारेही काही पुरावे सापजल्याने या रोगाची उत्पत्ती आणि त्याचा उद्रेक अस्पष्ट आहे. [४] [५]
युरोपमध्ये काळ्या प्लेगचा प्रादुर्भाव सर्वप्रथम १३४७ साली क्रायमियामधील काफ्फा बंदराला मंगोल सेनापती जानी बेगच्या सोनेरी टोळधाडीतील सैनिकांत दिसल्याची नोंद आहे. येथून जिनोआला जाणाऱ्या जहाजांमधून बहुधा काळ्या उंदरांवर राहणाऱ्या पिसूंनी वाहून नेले होते. येथून ते ते भूमध्यसागरीय बंदरांतून पसरले इस्तंबूल, सिसिली आणि इटालियन द्वीपकल्प मार्गे उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उर्वरित युरोपमध्ये पोहोचले होते. [६] एकदा हा रोग किनाऱ्यावर आल्यावर प्रामुख्याने न्यूमोनिक प्लेगच्या रूपात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरल्याच्या नोंदीही आहेत. या साथीच्या जलद अंतर्देशीय प्रसारावरून कळून येते की याचे प्राथमिक वाहक उंदीरांवरील पिसूंपेक्षा अधिक वेगवान असे काहीतरी होते. [७] [८] [९]
२०२२मध्ये असे आढळून आले की १३३० च्या दशकाच्या उत्तरार्धात आजच्या किर्गिझस्तानमध्ये काळ्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अचानक वाढ झाली. अनुवांशिक पुराव्यांशी जोडल्यास याचा अर्थ असा होतो की काळ्या प्लेगचा सुरुवातीचा प्रसार पूर्वीच्या अनुमानानुसार १४व्या शतकातील मंगोल विजयांमुळे झाला नसावा. [१०] [११]
काळा प्लेग ही मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोपवर आलेली ही दुसरी मोठी नैसर्गिक आपत्ती होती (पहिली म्हणजे 1ृ१३१५-१३१७चा मोठा दुष्काळ ) आणि त्यात युरोपीय लोकसंख्येचा ३०% ते ६०% लोकांचा तर मध्यपूर्वेतील लोकसंख्येचा ३३%. भाग मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. [१२] [१३] [१४]
मध्ययुगाच्या उत्तरार्धात काळ्या प्लेगचे आणखी अनेक उद्रेक झाले. सततच्या या महामाऱ्यांमुळे युरोपीय लोकसंख्येने १६व्या शतकापर्यंत १४व्या शतकातील पातळी परत मिळवली नाही. [a] [१५] याच प्लेगचा उद्रेक १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभर परत परत होत राहिला. शेवटच्या साथीत भारतातही मोठी जीवितहानी झाली.
मृतांची संख्या
मृतांच्या संख्येची अचूक आकडेवारी आजही नाही. या महामाऱ्यांमध्ये मृत्यूंचा दर प्रादेशिकतेनुसार मोठ्या प्रमाणात बदलतात. जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. [१६] काही अंदाजांनुसार युरेशियामध्ये ७.५ ते २० कोटी लोकांचा मृत्यू झाला असावा[१७] [१८] [१९]
आधुनिक काळातील साथ
आधुनिक उपचार पद्धतींमध्ये कीटकनाशके, प्रतिजैविकांचा वापर आणि प्लेगची लस यांचा समावेश होतो. तरीसुद्धा अशी भीती आहे की हा प्लेग जीवाणू औषधांचा प्रतिकार विकसित करू शकतो आणि पुन्हा आरोग्यासाठी मोठा धोका बनू शकतो. १९९५मध्ये मादागास्करमध्ये बॅक्टेरियमच्या औषध-प्रतिरोधक स्वरूपाचे एक प्रकरण आढळून आले [२०] नोव्हेंबर २०१४मध्ये मादागास्करमध्ये आणखी एक उद्रेक नोंदवला गेला [२१] आधुनिक काळातील प्लेगचा सर्वात प्राणघातक उद्रेक ऑक्टोबर २०१७मध्ये मादागास्करमध्येच झाला. यात १७० लोक मारले गेले आणि हजारो संक्रमित झाले होते. [२२]
आधुनिक प्लेगचचे संक्रमण झाल्यानंतरचा मृत्यू दराचा अंदाज प्रतिजैविकांच्या वापरानंतर ११% आहे. हा दर अविकसित प्रदेशांमध्ये जास्त असू शकते. [२३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Economic life after Covid-19: Lessons from the Black Death". The Economic Times. 29 March 2020. 21 June 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 April 2020 रोजी पाहिले.
- ^ Haensch et al. 2010.
- ^ "Plague". World Health Organization. October 2017. 24 April 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 November 2017 रोजी पाहिले.
- ^ Wade, Nicholas (31 October 2010). "Europe's Plagues Came from China, Study Finds". The New York Times. 4 November 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2017 रोजी पाहिले.
- ^ Sussman 2011.
- ^ "Black Death | Causes, Facts, and Consequences". Encyclopædia Britannica. 9 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2019 रोजी पाहिले.
- ^ Snowden 2019.
- ^ "Plague". www.who.int (इंग्रजी भाषेत). 30 April 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-23 रोजी पाहिले.
- ^ McCoy, Terrence (2021-10-26). "Everything you know about the Black Death is wrong". Washington Post (इंग्रजी भाषेत). ISSN 0190-8286. 27 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-07-23 रोजी पाहिले.
- ^ "Mystery of Black Death's origins solved, say researchers". The Guardian (इंग्रजी भाषेत). 2022-06-15. 15 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-06-15 रोजी पाहिले.
- ^ Spyrou, Maria A.; Musralina, Lyazzat; Gnecchi Ruscone, Guido A.; Kocher, Arthur; Borbone, Pier-Giorgio; Khartanovich, Valeri I.; Buzhilova, Alexandra; Djansugurova, Leyla; Bos, Kirsten I. (2022-06-15). "The source of the Black Death in fourteenth-century central Eurasia". Nature (इंग्रजी भाषेत). 606 (7915): 718–724. Bibcode:2022Natur.606..718S. doi:10.1038/s41586-022-04800-3. ISSN 1476-4687. PMC 9217749 Check
|pmc=
value (सहाय्य). PMID 35705810 Check|pmid=
value (सहाय्य). - ^ Aberth 2010.
- ^ Alchon 2003.
- ^ "Plague was one of history's deadliest diseases[[:साचा:Snd]]then we found a cure". National Geographic. 6 July 2020. 2 December 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 December 2020 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ Galens J, Knight J (2001). "The Late Middle Ages". Middle Ages Reference Library. Gale. 1. 16 December 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 May 2020 रोजी पाहिले.
- ^ Olea RA, Christakos G (June 2005). "Duration of urban mortality for the 14th-century Black Death epidemic". Human Biology. 77 (3): 291–303. doi:10.1353/hub.2005.0051. PMID 16392633.
- ^ "Black death 'discriminated' between victims (ABC News in Science)". Australian Broadcasting Corporation. 29 January 2008. 20 December 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 November 2008 रोजी पाहिले.
- ^ "Black Death's Gene Code Cracked". Wired. 3 October 2001. 26 April 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 February 2015 रोजी पाहिले.
- ^ "De-coding the Black Death". BBC News. 3 October 2001. 7 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 November 2008 रोजी पाहिले.
- ^ Padma, T.V. (23 March 2007). "Drug-resistant plague a 'major threat', say scientists". SciDev.net. 19 July 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Plague – Madagascar". World Health Organisation. 21 November 2014. 2 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 November 2014 रोजी पाहिले.
- ^ Wexler, Alexandra; Antoy, Amir (16 November 2017). "Madagascar Wrestles With Worst Outbreak of Plague in Half a Century". The Wall Street Journal (इंग्रजी भाषेत). 17 November 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 November 2017 रोजी पाहिले.
- ^ Centers for Disease Control (CDC) (24 September 2015). "FAQ: Plague". 30 March 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 April 2017 रोजी पाहिले.
चुका उधृत करा: <references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"lead numbers" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.
<references>
ह्या मध्ये टाकलेला <ref>
"lead origin" ह्या नावाची खूणपताका ह्या पूर्वी वापरण्यात आलेली नाही.साचा:Ireland topics
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.