काळा ढोक
काळा ढोक या पक्ष्याला इंग्रजी मध्ये black stork असे म्हणतात.
ओळखण
हा पक्षी आकाराने मध्यम - बहाढा ढोकाएवढा छातीच्या खालचा भाग , पोट आणि शेपूटीच्या खालचा पांढरा भाग सोडला , तर उरलेल्या भागाचा रंग काळा असतो .त्याची चोच तांबडी , लाल अणकुचीदार असते व पाय तांबडे असतात .
वितरण
हे पक्षी हिवाळ्यात पाकिस्तान , उत्तर भारत , बलुचिस्तान ते दख्खन भागात दुर्मिळ सोलापूर जिल्ह्यातही क्वचितच आढळून येतात . स्तलांतर करताना गिलगीट आणि काश्मीरात दिसतात . मध्य युरोपात एप्रिल ते मे या काळात दिसतात .
निवासस्थाने
हे पक्षी नद्या , सरोवरे आणि दलदली या ठिकाणी आढळून येतात .
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली