Jump to content

कालिनिनग्राद ओब्लास्त

कालिनिनग्राद ओब्लास्त
Калининградская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

कालिनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
कालिनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हावायव्य
राजधानीकालिनिनग्राद
क्षेत्रफळ१,५१,००० चौ. किमी (५८,००० चौ. मैल)
लोकसंख्या९,५५,२८१ (इ.स. २००२)
घनता६३ /चौ. किमी (१६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-KGD
संकेतस्थळhttp://gov39.ru/

कालिनिनग्राद ओब्लास्त (रशियन: Калининградская область, कालिनिंग्राद्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील सर्वांत पश्चिमेकडील ओब्लास्त आहे. हा रशियाचा एकमेव भूभाग आहे जो एकसंध रशियापासून वेगळा आहे. कालिनिनग्राद ओब्लास्त बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसले असून त्याच्या भोवताली लिथुएनियापोलंड हे देश आहेत.

कालिनिनग्राद हे कालिनिनग्राद ओब्लास्ताचे राजधानीचे व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर पूर्वी क्यॉनिग्सबेर्ग या नावाने ओळखले जात असे. पूर्वी ते ऐतिहासिक प्रशियामधील महत्त्वाचे शहर होते. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धापर्यंत ते जर्मनीच्या पूर्व प्रशिया प्रांतात गणले जात असे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात कालिनिनग्राद ओब्लास्ताच्या परिसराची सोव्हिएत संघपोलंड यांदरम्यान वाटणी झाली. सोव्हिएत संघात सामावलेल्या या भूभागास सोव्हिएत अध्यक्ष मिखाइल कालिनिन याच्या नावावरून नवीन नाव देण्यात आले.

बाह्य दुवे