Jump to content

कालाब्रिया

कालाब्रिया
Calabria
इटलीचा प्रदेश
ध्वज
चिन्ह

कालाब्रियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
कालाब्रियाचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीकातान्झारो
क्षेत्रफळ१५,०८१ चौ. किमी (५,८२३ चौ. मैल)
लोकसंख्या२०,०९,२२७
घनता१३३.२ /चौ. किमी (३४५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-78
संकेतस्थळhttp://www.regione.calabria.it

कालाब्रिया (इटालियन: Calabria) हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रदेश आहे. इटालियन द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर वसलेल्या कालाब्रियाच्या पूर्वेस आयोनियन समुद्र, पश्चिमेला तिऱ्हेनियन समुद्र, नैऋत्येला मेसिनाच्या सामुद्रधुनीपलीकडे सिसिली तर उत्तरेला बाझिलिकाता प्रदेश आहेत. ऐतिहासिक काळात नेपल्सदोन सिसिलींच्या राजतंत्रांचा भाग असलेल्या कालाब्रियाचा ४२ टक्के भाग डोंगराळ आहे. कातान्झारो ही कालाब्रियाची राजधानी तर रेद्जो कालाब्रिया हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

कृषी व पर्यटन हे येथील प्रमुख उद्योग असून येथील ७० टक्के झाडे ऑलिव्हची आहेत.


बाह्य दुवे