Jump to content

कालापत्थर

कालापत्थर हे माउंट एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याचे ठिकाण आहे. येथे नेपाळच्या बाजूने जाण्यारांसाठी आता जवळपास कायमस्वरुपी बेसकॅंप आहे. याची उंची ५,५४५-५,५५० मी (१८,१९२- १९२०९ फूट) इतकी मोजण्यात आलेली आहे. या ठिकाणाच्या पलिकडे जाण्यास फक्त एव्हरेस्ट वर चढाईसाठी नोंदवलेल्या गिर्यारोहकांनाच परवानगी आहे. महाराष्ट्रातून बरेचसे गिर्यारोहक या ठिकाणी भेट देतात. मराठीत या जागेचे नाव काळापठार असे रुढ झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहक संस्था या ठिकाणी ट्रेकिंग आयोजित करतात. ट्रेकचे नाव एव्हरेस्ट बेस कॅंप असे आहे.