Jump to content

कालदंड योग

कालदंड योग हा पंचांगात दिलेल्या अनेक योगांपैकी एक अशुभ योग आहे..

रविवारच्या दिवशीचा चंद्र भरणी नक्षत्रात, सोमवारी आर्द्रात, मंगलवारी मघात, बुधवारी चित्रा नक्षत्रात, गुरुवारी ज्येष्ठात, शुक्रवारी अभिजितमध्ये आणि शनिवारच्या दिवशीचा चंद्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रात असेल तर हा कालदंड नावाचा दुर्योग बनतो. हा योग चालू असताना सुरू केलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी अतोनात कष्ट पडतात, अशी समजूत आहे.