कार्ल बेंत्स
कार्ल बेंत्स | |
---|---|
जन्म | नोव्हेंबर २५, इ.स. १८४४ कार्ल्सरूह, जर्मनी |
मृत्यू | एप्रिल ४, इ.स. १९२९ |
राष्ट्रीयत्व | जर्मन |
प्रसिद्ध कामे | मोटारीचा संशोधक |
कार्ल फ्रीडरिश बेंत्स (जर्मन: Karl Friedrich Benz) (नोव्हेंबर २५, इ.स. १८४४ - एप्रिल ४, इ.स. १९२९) हा एक जर्मन अभियंता होता. सर्वमान्यपणे बेंत्स याला जगातील पहिली इंधनावर चालणाऱ्या स्वयंचलित मोटारवाहनाच्या संशोधनाचे श्रेय दिले जाते. १८८६ साली त्याला त्याच्या संशोधनाचे पेटंट दिले गेले. तसेच बेंत्स हा मर्सिडिज-बेंझ ह्या विख्यात वाहन उत्पादक कंपनीचा संस्थापक आहे.