कार्बनची अपरूपे
कार्बनची इतर कार्बन अणूबरोबर संयोग पावण्याची क्षमता -संयुजा- खूप चांगली असल्याने कार्बन या मूलद्रव्याच्या अणूंपासून वेगवेळ्या तापमानानुसार आणि दबावानुसार वेगवेगळ्या रूपातले पदार्थ बनतात. अशा पदार्थांना कार्बनची अपरूपे म्हणतात.
कार्बनची चित्रांत दाखविलेली आठ अपरूपे शेकडो वर्षांपासून ज्ञात असली तरी, अजूनही कार्बनच्या नव्या नव्या अपरूपांचा शोध लागत असतो.